Ajit Pawar : 'वैयक्तिक कामे होणार नाहीत आणि आणूही नका' : अजितदादांचा विदर्भाच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

Ajit Pawar warns Vidarbha NCP Party workers : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी काल विदर्भाचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची शाळा घेतल्याची चर्चा आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Summary :

  • विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी सत्तेत असूनही कामे होत नसल्याची तक्रार केली.

  • अजित पवारांनी स्पष्ट केले की फक्त सार्वजनिक हिताची कामेच मान्य केली जातील, वैयक्तिक कामांना प्राधान्य नाही.

  • “माझ्या कार्यालयात आलेल्या प्रत्येक कामाची नोंद असते” असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना सज्जड इशारा दिला.

Nagpur News : सत्तेत असतानाही आमची कामे होत नाही. त्याची दखल घेतली जात नाही. मुंबई कार्यालयात दिलेल्या पत्रांना केराची टोपली दाखवली जाते असा आरोप करणाऱ्या विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आज अजित पवार यांनी चांगलेच खडसावले. माझ्या कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाची व त्यांनी सुचवलेल्या कामाची नोंद ठेवली जाते. कोणी, कुठले, काम सांगितले याचा सर्व तपशील उपलब्ध असतो. मात्र जी कामे सार्वजनिक हिताची असतील तिच मी करतो असे सांगून अजित पवार यांनी कोणीही आपले वैयक्तिक कामे घेऊन येऊ नका अशा स्पष्ट शब्दात कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत.

काल नागपूरमध्ये झालेल्या विभागीय मेळाव्यात अजित पवार यांनी आपल्या कामाची पद्धत सांगितली. तसेच नागपूर, मुंबई आणि पुण्यातील कार्यालयात असलेल्या सर्व सहाय्यकांची नावे सांगून त्यांच्याकडे कामे पाठवा असे आवाहन केले. तुमची काही कामे असतील तर आजच सांगा, ती लिखीत ही माझ्याकडे द्या. आता नाही तर मी मुंबईला जायच्या आधी विमानतळावर आणून द्या असेही ते म्हणाले. माझा कार्यकर्ता कुठल्याही कार्यालयात गेला तरी तो अजित पवारांचे काम घेऊन आला असे अधिकाऱ्यांना मी सांगून ठेवता. हे सांगताना त्यांनी पुन्हा वैयक्तिक कामे होणार नाही असेही सर्वांना बजावले.

Ajit Pawar
Ajit Pawar : अजितदादा वळून पाहतात अन् म्हणतात, I Love you too...; काय घडला प्रसंग जाणून घ्या?

मी 35 वर्षांपासून राजकारणात आहे आणि कामे करतो. प्रत्येक वेळी सत्तेत होतोच असेही नाही. मात्र आपण अधिकाऱ्यांसोबत कसे संबंध ठेवतो यावरही बरेच काही अवलंबून असते. नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री या नात्याने मला कार्यालय मिळाले आहे. तेथे स्टाफ उपलब्ध आहे. माझ्या माहितीनुसार नागपूरचा एकही पदाधिकारी या कार्यालात काम घेऊन आलेला नाही, अशी माझी माहिती आहे.

जे येतात त्यांची कामे होतात. माझ्याकडे आलेल्या कामांची माहिती घेऊन माझे सहायक स्वतः ज्या अधिकाऱ्यांकडे काम असेल तेथे जातात आणि कामे मार्गी लावतात. सत्तेत असलो म्हणजे सर्वच कामे होतात असे नाही. उद्या तुम्ही मुख्यमंत्री झाला तरी ते करू शकत नाही. कामांचे काही नियम असतात. तांत्रिक अडचणी असतात. आजही माझ्याकडे दोन शिष्टमंडळ एका जागेच्या संदर्भात भेटायला आले होते.

त्यांच्या माहितीवरून ज्या जागेची त्यांनी मागणी ते काम मी होणार नाही असे त्यांना स्पष्टच सांगितले. त्यामुळे जी कामे होणार असतील, नियमात असतील तीच घेऊन या, उगाच हेलपाटे मारू नका असा सल्लाही यावेळी अजित पवार यांनी दिला. जाता जाता अजित पवार यांनी शेवटी कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो. त्यांची कामे झाली पाहिजे अशीही पुस्तीही जोडली.

Ajit Pawar
Ajit Pawar NCP: अजितदादांच्या विदर्भ दौऱ्यापूर्वीच गंभीर आरोप, राष्ट्रवादीत उडाली खळबळ; 'सत्तेत असूनही...'

FAQs :

प्र.१: राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी कोणता आरोप केला?
उ: त्यांनी सांगितले की सत्तेत असूनही त्यांची कामे होत नाहीत आणि मुंबई कार्यालयातील पत्रांकडे दुर्लक्ष केले जाते.

प्र.२: अजित पवारांनी काय उत्तर दिले?
उ: अजित पवारांनी सांगितले की फक्त सार्वजनिक हिताची कामेच केली जातील, वैयक्तिक कामे नाही.

प्र.३: अजित पवारांनी कोणता इशारा दिला?
उ: त्यांनी कार्यकर्त्यांना वैयक्तिक कामांसाठी कार्यालयात येऊ नये, असे स्पष्टपणे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com