Ajit Pawar NCP: अजितदादांच्या विदर्भ दौऱ्यापूर्वीच गंभीर आरोप, राष्ट्रवादीत उडाली खळबळ; 'सत्तेत असूनही...'

Ajit Pawar Political Controversy : राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अजितदादांच्या कार्यालयात दिलेली पत्रं गहाळ होतात. ते पुढे सरकतच नाही याची सार्वत्रिक खंत कार्यकर्त्यांची आहे. येत्या 21 ऑगस्टला अजितदादा विदर्भात येत आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: सत्तेत असतानाही विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची कामे होत नाही. त्यांच्या पत्राची दखल घेतली जात नाही. महत्त्वाची जबाबदारी दिली जात नाही. मंडळे, शासकीय पदे दिली जात नसल्याची तक्रार आजही कायम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची राज्यात पंधरा वर्षे सत्ता होती. आता अजित पवार (Ajit Pawar) महायुतीत सहभागी झाले आहे. यानंतरही ही ओरड कायमच आहे.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील अजितदादांच्या कार्यालयात दिलेली पत्रं गहाळ होतात. ते पुढे सरकतच नाही याची सार्वत्रिक खंत कार्यकर्त्यांची आहे. येत्या 21 ऑगस्टला अजित दादा विदर्भात येत आहेत. नागपूरला त्यांच्या उपस्थित एका कार्यक्रमाचे आयोजन केले जात असून यात आमची पत्रे गहाळ होत असल्याची तक्रार करण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार नागपूरमार्गे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे जाणार आहे. ही संधी साधून नागपूरमध्ये एका कार्यक्रम घेण्याचे नियोजन पूर्व विदर्भातील पदाधिकाऱ्यांमार्फत केले जात आहे. याकरिता मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. याबैठकीत राष्ट्रवादीचे (NCP) पूर्व विदर्भाचे समन्वयक राजू जैन, नागपूर शहराचे अध्यक्ष प्रशांत पवार, कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

नागपूरच्या कार्यक्रमात इतर पक्षातील काही कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येते. यावेळी प्रशांत पवार यांनी पक्षाच्या कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्ते येत नाहीत, सूचना दिल्यानंतरही येत नाही. आंदोलनात सहभागी होत नसल्याने नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar
Nitin Gadkari: 'मोदींना निवृत्त करावं अन् 2014 ला कट रचून 'PM'पदाची संधी हिरावलेल्या गडकरींना...'; बड्या नेत्याचं सरसंघचालक भागवतांनाच पत्र

तसेच ही मंडळी कामाचे नाही असे जाहीर करावे आणि ज्यांना पक्षाचे काम करायचे आहे त्यांची नियुक्ती करण्याची मागणी यावेळी केली. मोठे नेते येतात तेव्हा सर्वजण हारतुरे घेऊन समोर उभे असतात. आंदोलन असले की हीच संख्या अर्ध्यावर येते, अशी टीकाही यावेळी करण्यात आली.

आमची कामे होत नाहीत, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात कामासंदर्भात पत्र देतो, तेव्हा पुढे त्याचे काय होते हे कोणाला कळत नाही. त्याची दखलही घेतल्या जात नाही. काम होणार की नाही हेसुद्धा कळविले जात नाही. फक्त पत्र दिल्याचे समाधान होते प्रत्यक्षात एकही काम होत नसल्याची नाराजी यावेळी अनेकांनी बोलून दाखवली.

Ajit Pawar
BJP Kolhapur: भाजप जिल्हा कार्यकारिणी निवडीवरून भडका; आमदार, मंत्र्यांकडे तक्रार

हे बघता हा सर्व प्रकार अजितदादांच्या कानावर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. अजितदादा वेळेचे पक्के आहेत. त्यामुळे हार-तुरे देण्यात वेळ गमावू नका. आपले म्हणणे मांडा, लेखी निवेदन द्यावा, असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com