Ajit Pawar's MLA : शंभूराज देसाईंच्या 'त्या' विधानाला ‘दादां’च्या आमदाराचे समर्थन, म्हणाले वडेट्टीवार भाजपमध्ये जाणार !

Amol Mitkari News : अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी समर्थन दिलं आहे.
Shambhuraj Desai, Vijay Wadettiwar and Amol Mitkari
Shambhuraj Desai, Vijay Wadettiwar and Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Vidarbha Political News : राज्याच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यता राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी वर्तवली आहे. शरद पवार गटाचा मोठा नेता शिंदे-फडणवीस सरकार सोबत येणार, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं आहे.

या वक्तव्याला राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी समर्थन दिलं आहे. (Amol Mitkari MLA of Ajit Pawar group has supported)

शंभूराज देसाई यांच्या बोलण्यात तथ्य आहे आणि दिवाळीपूर्वी आमचं संख्याबळ हे चारने वाढलेलं दिसेलच, असं वक्तव्य आमदार अमोल मिटकरी यांनी अकोल्यात माध्यमांशी बोलताना केलं आहे.

शंभूराज देसाई यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शंभूराज देसाई यांनी म्हटलं की, शरद पवार गटातील काही नेते हे महायुतीच्या सरकारमध्ये येण्यास इच्छुक आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दसऱ्याला जोरदार धमाका?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शरद पवार गटातील अनेक नेत्यांची चर्चा सुरू आहे आणि दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे नवरात्र-दसऱ्याला आपण जोरदार धमाका करतो, तर गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वात नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. तसंच काहीसं घडू शकतं, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

शंभूराज देसाई यांच्या या विधानाने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत मंत्री शंभूराजे देसाई यांच्या वक्तव्यात तथ्य असल्याचं म्हणत त्यांनी समर्थन दिलं आहे.

दिवाळीपूर्वी मोठा राजकीय हादरा होणार असल्याचे आमदार मिटकरी म्हणाले. त्यांनी माध्यमांनाही ही प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या संख्याबळामध्ये वाढ होते. आमचं संख्याबळ हे ४८ होणार असल्याचे मिटकरी म्हणाले.

काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी ?

राज्याच्या राजकीय पटलावर मोठा भूकंप होणार आहे. शरद पवार गटाचा मोठा नेता शिंदे फडणवीस सरकार सोबत येणार, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं आहे. या वक्तव्याला समर्थन देत शंभूराज देसाई यांच्या बोलण्यात तथ्य आहे आणि दिवाळीपूर्वी आमचा संख्याबळ हे चारने वाढलेलं दिसेलच, असं अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.

वडेट्टीवर लवकरच भाजपमध्ये

अजितदादा म्हणजे भाजपसाठी 'यूज अँड थ्रो' आहेत. त्यामुळे ते राज्याचे मुख्यमंत्री कधीच होऊ शकत नाहीत, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावरही आमदार मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत, येत्या काही दिवसांत वडेट्टीवार स्वतः भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे.

Shambhuraj Desai, Vijay Wadettiwar and Amol Mitkari
Akola Vikhe Patil News : नव्या पालकमंत्र्यांचा मुहूर्त निघाला, 'श्रीं’चे दर्शन घेऊन होणार 'ॲक्टिव्ह'!

ते सध्या विरोधी पक्षनेते आहेत म्हणून तसं बोलत आहेत, असेही मिटकरी म्हणाले. त्यांनी आमचा ‘यूज अँड थ्रो’ काढण्यापेक्षा त्यांचा शिवसेना आणि काँग्रेसकडून कसा ‘यूज अँड थ्रो’ झाला ते पाहावे, असा टोला आमदार मिटकरी यांनी वडेट्टीवर यांना लगावला आहे.

Edited By : Atul Mehere

Shambhuraj Desai, Vijay Wadettiwar and Amol Mitkari
Akola Shivsena News : रेल्वे स्थानक प्रवेशद्वाराला महापुरुषांचे नाव देण्यावरून, 'शिवसेने'नंतर 'वंचित'ही आक्रमक!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com