News Arena India Survey : भाजपाच्या आकाश फुंडकरांना अन् शिंदे गटाच्या संजय गायकवाडांना बसणार धक्का; काँग्रेसला लागणार लॉटरी...

Buldhana News : विदर्भात विधानसभेच्या एकून ६२ जागा आहेत.
Akash Phundkar, Sanjay Gaikwad News
Akash Phundkar, Sanjay Gaikwad NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आता झाल्या तर भाजपाला सव्वाशे जागा मिळतील, असा अंदाज 'न्यूज अरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भात विधानसभेच्या एकून ६२ जागा आहेत. मात्र, बुलडाण्यातील भाजपची एक आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाची एक जागा धोक्यात असल्याचे सांगितले आहे.

बुलडाणा जिल्ह्यामध्ये भाजपला तीन तर काँग्रेसला दोन आणि शिवसेना शिंदे गटाला 1 जागा मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेसलाही 1 जागा दाखवण्यात आली आहे. यामुळे बुलडाणा जिल्ह्यामध्ये मागील दोन निवडणुकांमध्ये भाजपा जिंकत असलेली खामगावची जागा मात्र, धोक्यात असल्याचे सांगितेल आहे. तसचे बुलडाणा (Buldhana) विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांची जागाही धोक्यात असल्याचा दावा सर्व्हेमध्ये करण्यात आला आहे.

Akash Phundkar, Sanjay Gaikwad News
Ganesh Sugar Factory Result : विखे पाटलांना होमग्राउंडवर धक्का; थोरात-कोल्हे पॅनलची विजयाकडे घोडदौड

सर्व्हेच्या अंदाजानुसार बुलडाण्याची जागा काँग्रेसला मिळणार असल्याचे सांगितेल आहे. तर खामगावच्या आकाश फुंडकर यांच्या जागेवरही काँग्रेसचे उमेदवार निवडून येणार असल्याचा अंदाज सर्व्हेमध्ये दाखवण्यात आला आहे. तर विदर्भात भाजपाला (BJP) या सर्व्हेनुसार ३० ते ३१ जागा दाखवल्या आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) अवघ्या पाच जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसताना दिसत आहे. त्यांना एकही जागा मिळणार नसल्याचे म्हटले आहे.

तर काँग्रेसला (Congress) २० ते २१ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसलाही अवघ्या दोन जागा दाखवण्यात आल्या आहेत. तर इतर पक्षांना ४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भामध्ये सर्व्हेनुसार सगळ्यात मोठा पक्ष भाजपा तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे.

Akash Phundkar, Sanjay Gaikwad News
News Arena India Survey - Vidarbha: विदर्भात भाजपाला सर्वाधिक जागा; काँग्रेसलाही फायदा, ठाकरेंना फटका...

भाजपला आत्तापर्यंत सर्वाधिक म्हणजे १२३ ते १२९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) ५५, तर काँग्रेसला ५० ते ५३ जागा मिळणे अपेक्षित आहे. शिवसेना ठाकरे गटाला १७ ते १९ जागा मिळतील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढविली, तर काँग्रेसला सर्वाधिक फायदा होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com