Akola Lok Sabha Constiuency : पन्नाशीच्या आतील मतदार ठरतील अकोल्याचा खासदार निवडताना महत्त्वाचा दुवा !

Lok Sabha Election 2024 : या निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडण्याची ज्यांच्याकडे मतांची शक्ती आहे. त्या मतदारांना आपलंसं करण्यात अनेक इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत.
Akola Lok Sabha Constiuency
Akola Lok Sabha ConstiuencySarkarnama
Published on
Updated on

Akola Lok Sabha Constiuency : लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे उत्सुकता लागली आहे ती अकोल्याचा नवा खासदार कोण याची. लोकशाहीत मतदार हाच राजा असतो. तो जो ठरवेल तोच लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येतो. आगामी लोकसभा निवडणुकीत अकोल्याचा खासदार ठरविण्यात पन्नाशीतील तरुणांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. कारण पन्नाशीच्या आतील वयोगटातील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

देशाच्या भविष्याला दिशा देणारी आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष, आघाड्या, युती या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला लागले असून, निवडणुकीतील महत्त्वाचा घटक असलेल्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षांकडून करण्यात येत आहे. या निवडणुकीत लोकप्रतिनिधी निवडण्याची ज्यांच्याकडे मतांची शक्ती आहे. त्या मतदारांना आपलंसं करण्यात अनेक इच्छुकांकडून प्रयत्न सुरू आहेत.

अकोल्याचा नवीन खासदार कोण असेल, अशी चर्चाही आता होऊ लागली आहे. मात्र, अकोल्याचा नवा खासदार निवडणाऱ्या मतदारांमध्ये कोणत्या वयोगटातील किती मतदार आहेत. हे प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून समोर आलं आहे. अकोल्यातील आगामी लोकसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांच्या संख्येमध्ये पन्नाशीच्या आतील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola Lok Sabha Constiuency
Akola Police : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अकोला पोलिसांना कौतुकाची थाप

अकोला जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये अकोला पूर्व, अकोला पश्चिम, मूर्तिजापूर, बाळापूर आणि अकोट या पाचही मतदारसंघांत एकूण मतदारांची संख्या 15 लाख 62 हजार 70 एवढी आहे. यामध्ये पुरुष मतदार 8 लाख 5 हजार 986 इतके असून, महिला मतदार 7 लाख 56 हजार 35 आहेत. पुरुष मतदारांबरोबरच महिला मतदारांच्या संख्येत भर पडली आहे. महिला मतदारांची संख्याही वाढली असून, लिंग गुणोत्तरात 8 गुणांकांची वाढ झाली आहे.

हे मतदार ठरवतील अकोल्याचा खासदार !

मतदारांची नोंदणी करण्यात आल्यानुसार अंतिम आकडेवारी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली. एकूण मतदारांच्या संख्येमध्ये पन्नाशीच्या आतील मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामध्ये 20 ते 49 वयोगटातील सर्वाधिक म्हणजेच 9 लाख 89 हजार 141 मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे पन्नाशीच्या आतील मतदार हे अकोल्याचा खासदार ठरवू शकतात. तथापि, आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच मतदारांची पसंती महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

पन्नाशीच्या आतील मतदार यांच्यामध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक असते. हे मतदार योग्य उमेदवाराची निवड करण्यात सक्षम असतात. पन्नाशीच्या आतील मतदारांवर सर्वच पक्षांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे. त्यामुळे अकोला लोकसभा मतदारसंघात पन्नाशीच्या आतील मतदार हे महत्त्वाचा दुवा ठरणार, हे निश्चित.

Edited By : Atul Mehere

R

Akola Lok Sabha Constiuency
Akola ZP : मिनी मंत्रालयात प्रशासनापासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलांची सत्ता !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com