Akola ZP : मिनी मंत्रालयात प्रशासनापासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत महिलांची सत्ता !

Vanchit Bahujan Aghadi : अकोला जिल्हा परिषदेवर सध्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. पक्षाच्या आचारसंहितेनुसार महिलांना संधी देऊन पक्षाने राजकारणात एक नवा पायंडा घातला आहे.
Akola ZP Women
Akola ZP WomenSarkarnama
Published on
Updated on

Akola ZP : जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या अकोला जिल्हा परिषदेचा कारभार महिलाच हाकत आहेत. प्रशासनापासून तर पदाधिकाऱ्यांपर्यंत संपूर्ण जिल्हा परिषद सध्या महिलांच्या ताब्यात आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष, चार सभापतिपदांवर महिला राज आहे.

सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. सर्वत्र महिलांचा सन्मान होत आहे. जिल्ह्याचे मिनी मंत्रालयावर सध्या महिला राज पाहायला मिळत आहे. महिलांना शिक्षण, नोकरीत शिवाय राजकारणातदेखील पन्नास टक्के आरक्षण मिळालं. परिणामी महिलांनी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आपलं कर्तृत्व सिद्ध करत आज महिलांनी सर्वच क्षेत्र व्यापले आहेत. अकोला जिल्हा परिषदेवर सध्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे. पक्षाच्या आचारसंहितेनुसार महिलांना संधी देऊन पक्षाने राजकारणात एक नवा पायंडा घातला आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बु. सर्कलच्या सदस्य संगीता अढाऊ या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला संधी मिळाली आहे. त्या गेल्या सव्वा वर्षांपासून सक्षमपणे आपला कारभार सांभाळत आहेत. शिवाय सभापतिपदी मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम सर्कलच्या योगिता रोकडे (कृषी व पशुसंवर्धन), रिझवाना परवीन शे. मुख्तार (महिला व बालकल्याण), पारस सर्कलच्या आम्रपाली अविनाश खंडारे (समाजकल्याण) व सिरसो सर्कलच्या माया संजय नाईक (शिक्षण) खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत. मिनी मंत्रालयात सहापैकी पाच पदांवर महिला असल्याने ग्रामविकासाची जबाबदारी खऱ्या अर्थाने महिलांच्या खांद्यावर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola ZP Women
Akola Police : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अकोला पोलिसांना कौतुकाची थाप

मिनी मंत्रालयाचे प्रशासनही महिलांकडेच...

अकोला जिल्हा परिषदेत सध्या अध्यक्षपदासह चार सभापतिपदांवर महिला राज असतानाच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बी. वैष्णवी या कामकाज सांभाळत आहेत. बी. वैष्णवी या गेल्या सात महिन्यांपासून जिल्हा परिषदेत कार्यरत आहेत. बी. वैष्णवी आयएएस असून, अतिशय चोखपणे आपली भूमिका त्या पार पाडत आहेत, तर त्यासोबतच माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी माया शिर्के, महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिता तेलंग या महिला प्रशासनात सक्षमपणे कारभार चालवत आहेत.

राजकारणात महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळाल्यानंतर सर्वच क्षेत्रांत महिलांनी आघाडी घेतली. अकोला जिल्ह्यातही अनेक प्रमुख पदांवर सध्या महिला आहेत. जिल्हा परिषदेची सत्ता सध्या महिलांच्या ताब्यात असल्याने आज खऱ्या अर्थाने ग्रामविकासाची दोरी महिलांच्या हातात आली आहे. पूर्वी ग्रामीण भागात महिलांना कुठेही स्थान मिळत नव्हतं. मात्र, आता आरक्षणामुळे महिलांचा राजकारणासह प्रशासनात दबदबा वाढत आहे. यामुळेच खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होत आहे.

Edited By : Atul Mehere

R

Akola ZP Women
Amit Shah Akola Visit : अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर भाजपमध्ये उमेदवारीवरून तर्कवितर्क !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com