Akola Police
Akola PoliceSarkarnama

Akola Police : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अकोला पोलिसांना कौतुकाची थाप

Damiti Squade : महिलांच्या सुरक्षेसाठी अकोला पोलिसांचा पुढाकार. गृहमंत्र्यांनी घेतली दखल. अकोला पोलिस अधीक्षकांना म्हटले ‘गुड वर्क’
Published on

Akola Police : जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर त्यांनी भर दिला आहे. शहरासह जिल्ह्यातील गावगुंडांना वठणीवर आणण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ‘एमपीडीए’ व तडीपारीचे हत्यार उपसले आहे. अकोला पोलिसांच्या कामावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप दिली आहे. त्यांनी आपल्या ट्विटरवरून पोस्ट करीत अकोला पोलिसांच्या कार्याची स्तुती केली आहे.

अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पदभार स्वीकारल्यापासून गुंडांना ‘सळो की पळो’ करून सोडले आहे. स्थानिक गुन्हे शाखेमार्फत धडाकेबाज कारवाई आणि अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल सध्या करण्यात येत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी झोपडपट्टी दादा कायद्याचा वापर पोलिसांकडून करण्यात येत आहे. या कायद्यानुसार अनेकांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एमपीडीए आणि हद्दपारीचे अस्त्र उगारले आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. ही निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठीही पोलिसांनी कंबर कसली आहे. संवेदनशील जिल्हा म्हणून अकोल्याची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख पुसण्याचे आवाहन सध्या अकोला पोलिसांसमोर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola Police
Amit Shah Akola Visit : अमित शाह यांच्या दौऱ्यानंतर भाजपमध्ये उमेदवारीवरून तर्कवितर्क !

अकोला जिल्ह्यातील महिला व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध योजना अकोला पोलिस दल राबवित आहे. अकोला शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच दामिनी पथक कार्यरत होते. पोलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या संकल्पनेतून आता संपूर्ण जिल्हाभर दामिनी पथक कार्यरत करण्यासाठी विशेष पाठपुरावा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने यापथकाला 34 वाहन उपलब्ध करून दिले आहेत. त्या वाहनांचा लोकार्पण सोहळा पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्या हस्ते नुकताच पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात अकोला पोलिसांची शॉर्ट फिल्म दामिनीने करण्यात आली. दामिनी पथकाची कार्यपद्धत ही शहर व ग्रामीण भागात महिला व विद्यार्थिनींची सुरक्षा करण्याची आहे. त्यामुळे हे पथक त्यासाठीच कार्यरत राहिल, असे पोलिस अधीक्षकांनी या वेळी सांगितले.

पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी विधायाक कामासाठी अकोला प्रशासन नेहमी सकारात्मक आहे, असे मत मांडले, उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांनी आपल्या आयुष्यातील अनुभव कथन केले. परिस्थती कशीही असली तरी दामिनी बनत आपले कार्य करावे, असे विचार प्रगट केले. पोलिस विभागाच्या उपक्रमाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अकोला पोलिस दल आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे कौतुक केले आहे. आपल्या सोशल मीडियावरून अकोला पोलिसांचे ट्विटला परत ट्विट करीत पोलिसांच्या चांगल्या कामाचे कौतुक केले. अकोला शहरासह जिल्ह्यातील महिला आणि विद्यार्थिनी यांच्या सुरक्षेसाठी तत्पर असणाऱ्या दामिनी पथकात पोलिस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून नव्या 34 वाहनांची भर पडली आहे.

Akola Police
Amit Shah Akola Visit: शाहांनी जिंकली सगळ्यांची मने; अकोल्यात कार्यकर्त्यांची लॉटरीच लागली...

अकोला शहरामध्ये महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एकच दामिनी पथक कार्यरत होते. आता तब्बल 34 दुचाकी वाहनांद्वारे शहरात गस्तीवर भर देण्यात येणार आहे. 34 महिला पोलिसांना या दुचाकींचे वाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून संपूर्ण शहरात गस्त घातली जाणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे महिला आणि विद्यार्थिनी यांना होणाऱ्या त्रासाला वेळीच रोखण्यासाठी या पथकाची मोठी मदत होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला दामिनी पथकाचा विस्तार करण्यात आला. त्यानंतर गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देत अकोला पोलिस दलाचे कौतुक करीत त्यांचे मनोबल उंचावले.

Edited By : Prasannaa Jakate

R

Akola Police
Amit Shah Akola Visit : धीरगंभीर दिसणाऱ्या शाहांनी अख्ख्या सभागृहाला खळखळून हसवले अन॒ रडवलेही...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com