Congress On Sanjay Raut: सांगलीचा वाद चिघळणार, संजय राऊतांच्या दौऱ्याकडे काँग्रेसची पाठ

Sangil Lok Sabha Constituency 2024: आम्हाला विचारात न घेता ठाकरे गटाने ही उमेदवारी जाहीर केली असल्याने काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली आहे. अशातच ठाकरे गटाकडून झालेल्या मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती.
Sangil Lok Sabha Constituency 2024
Sangil Lok Sabha Constituency 2024Sarkarnama
Published on
Updated on

Sangali: सांगली लोकसभा मतदारसंघातील (Sangli Lok Sabha Constituency 2024) महाविकास आघाडीतील वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यांनी खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut)यांच्या दौऱ्याकडे पाठ फिरवली आहे.

काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा केला जात असून, कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला ही जागा मिळावी, यासाठी काँग्रेसचे नेते ठाम आहेत. मात्र, ठाकरे गटानेही आपला दावा कायम ठेवला आहे. आज खासदार संजय राऊत सांगली दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवण्याचे नियोजन केले आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, ही जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम (Vishwajit Kadam), विशाल पाटील (Vishal Patil), आमदार विक्रम सावंत यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आम्हाला विचारात न घेता ठाकरे गटाने ही उमेदवारी जाहीर केली असल्याने काँग्रेसने महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली आहे. अशातच ठाकरे गटाकडून झालेल्या मेळाव्यात काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि शिवसेनेतील वाद चव्हाट्यावर आला आहे. वरिष्ठ नेत्यांकडून दोघांमध्ये मनधरणी सुरू असताना पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेत्यांनी खासदार संजय राऊत यांच्या मेळाव्याकडे पाठ फिरवली आहे. त्यांच्या दौऱ्यात उपस्थित न राहण्याचे एकमताने ठरवले असल्याची माहिती समोर येत आहे.

ठाकरे गटावर नाराजी

खासदार संजय राऊत यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विशाल पाटील हे मुंबई आहेत, तर विश्वजित कदम हे पुण्यात आहेत. सांगली जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष विक्रम सावंत हे जत या मतदारसंघात आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसकडून दावा करण्यात आला आहे. या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये मैत्रीपूर्ण लढत घेण्यात यावी, असा प्रस्ताव राज्यातील काँग्रेस नेत्यांनी दिला होता. पण त्यावर अजून दिल्लीतील काँग्रेस नेत्यांकडून उत्तर आलं नाही आहे. त्यामुळे सांगलीतील काँग्रेस नेत्यांची ठाकरे गटावर नाराजी व्यक्त करीत या दौऱ्यासाठी उपस्थित न राहण्याचे ठरवले आहे.

Sangil Lok Sabha Constituency 2024
Harishchandra Chavan News:भाजपची चिंता वाढणार; माजी खासदार बंडखोरीच्या तयारीत? भारती पवारांना विरोध

निमंत्रणच आले नाही...

'शिवसेना ठाकरे गटाकडून आम्हाला दौऱ्याचे कोणतेही निमंत्रण आलेले नाही. जर निमंत्रणच आले नसेल तर आम्ही उपस्थित का राहू?,असा प्रश्न काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांनी उपस्थित केला आहे."सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे ही जागा आमचीच आहे, ती आम्ही मिळवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. मैत्रीपूर्ण प्रस्तावही ठेवला आहे. जोपर्यंत आम्हाला निर्णय येत नाही. तोपर्यंत आम्ही जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करू. त्यानंतर योग्य निर्णय आम्ही जाहीर करू, अशी प्रतिक्रिया आमदार विक्रम सावंत यांनी 'सरकारनामा'ला दिली.

Edited by: Mangesh Mahale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com