Girish Mahajan Politics: गिरीश महाजनांचा गर्भित इशारा; 'उन्मेष पाटील यांना परिणाम समजतील'

Unmesh Patil : उन्मेष पाटील यांच्या शिवसेना प्रवेशाने भाजपची तातडीने डॅमेज कंट्रोलसाठी बैठक
Unmesh Patil, Girish Mahajan
Unmesh Patil, Girish Mahajansarkarnama

Jalgaon BJP News : खासदार उन्मेष पाटील यांनी करण पवार यांसह भाजप सोडली. त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे. लगोलग करण पवार यांना शिवसेनेने जळगाव मतदारसंघाची उमेदवारी जाहीर केली. अन्य पक्ष फोडण्यात तरबेज असलेल्या आणि प्रतिस्पर्धी नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश देताना विरोधकांवर शेरेबाजी करण्यात गिरीश महाजन आघाडीवर राहिले आहेत.

मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत चित्र उलटे झाले. जळगावमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे. उमेदवारी नाकारल्याने खासदार पाटील यांनी भाजप आणि गिरीश महाजन दोघांनाही धक्का दिला.

हा धक्का गिरीश महाजन यांना चांगलाच वर्मी बसल्याचे दिसून आले. करण पवार यांना शिवसेना ठाकरे गटाने जळगाव मतदारसंघाची उमेदवारी दिली. याचवेळी खासदार उन्मेष पाटील यांचाही प्रवेश झाला आहे. त्यामुळे या दोघांच्या संपर्कात असलेल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे.

अन्य काही कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात असल्याने निवडणूक प्रचारात त्याचा फटका भाजपला बसू शकतो. याबाबत भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनीदेखील राज्याचे ग्रामविकासमंत्री आणि भाजप नेते गिरीश महाजन यांच्याशी संपर्क केला. त्यामुळे जळगाव भारतीय जनता पक्षात चांगलीच खळबळ उडाल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांची डॅमेज कंट्रोलसाठी जळगावमध्ये बैठक झाली.

Unmesh Patil, Girish Mahajan
Jalgaon loksabha 2024 : भाजप जळगावमधील उमेदवार बदलणार? माजी खासदाराने घेतली गिरीश महाजनांची भेट

या वेळी त्यांनी माजी खासदार ए. टी. पाटील यांच्याशी बंद दाराआड चर्चा केली. भाजप स्मिता वाघ (Smita Wagh) यांची उमेदवारी बदलू शकते अशी चर्चा सुरू होती. या चर्चेला ब्रेक देत महाजन यांनी भाजप मजबूत आहे. कोणताही उमेदवार बदलला जाणार नाही. आगामी निवडणुकीत भाजप (BJP) पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरेल. जळगावच्या दोन्ही जागा जिंकेल, असा दावा त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या वेळी महाजन यांनी उन्मेश पाटील यांच्यावरदेखील कोरडे ओढले. २०१९ मध्ये उन्मेश पाटील यांना उमेदवारी देतानादेखील कोणावर तरी अन्याय झाला होता. त्यामुळे पाटील यांनी यंदा उमेदवारी मिळाली नाही तरी नाराज व्हायला नको होते.

त्यांनी पक्षातच थांबायला हवे होते. भारतीय जनता पक्षामध्ये पाटील आणि करण पवार या दोघांनाही चांगले भवितव्य होते. त्यांनी पक्ष सोडण्याची घाई केली. पक्ष सोडल्यामुळे काय होते, हे त्यांना लवकरच समजून येईल, असा सूचक इशारादेखील महाजन यांनी या वेळी दिला.

Edited By : Umesh Bambare

R

Unmesh Patil, Girish Mahajan
Girish Mahajan Akluj Tour : भाजपचे संकटमोचक पुन्हा अकलूजमध्ये येणार; मोहिते पाटलांची नाराजी दूर करणार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com