Akola News | ठाकरेंचा निर्णय फडणवीसांनी फिरवला : आमदार देशमुखांचं उपोषणास्त्र ; 69 गावांचा पाणीप्रश्न पेटला!

Nitin Deshmukh : पाणी आरक्षणावरून बाळापूरचं राजकारण पेटलं..
Akola News : Devendra Fadnavis : Uddhav Thackeray : Nitin deshmukh : Prakash Bharsakle
Akola News : Devendra Fadnavis : Uddhav Thackeray : Nitin deshmukh : Prakash BharsakleSarkarnama
Published on
Updated on

Balapur Constituency : पाणी प्रश्नावरून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आजपासून आमरण उपोषण करणार आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाच्या ६९ गावांच्या पाणीपुरवठा योजनासाठी वाण धरणाच्या पाण्याचा आरक्षण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केला. याच मुद्द्यावरून आमदार देशमुख विधानभवनातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करणार आहेत. ६९ गावातील नागरिकदेखील अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषण करणार असल्याची माहिती मिळत आहे.

Akola News : Devendra Fadnavis : Uddhav Thackeray : Nitin deshmukh : Prakash Bharsakle
Old Pension Scheme: संपात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा? कुणी काढले आदेश?

२०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार असताना आमदार देशमुख यांच्या पाठपुराव्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळापूर मतदारसंघाच्या ६९ गावातल्या पाणाीपुरवठा योजनेला मंजुरी दिली होती. या योजनेसाठी २१९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी १९२ कोटी रूपये या योजनेसाठी लागणार होते. १०८ कोटी रूपये आतापर्यंत या योजनेवर खर्च झाले आहेत. ९२ कोटींचं देयक कंत्राटदाराला देण्यात आलेलं आहे.

बाळापूर मतदारसंघातल्या ६९ गावांसाठी तेलेरा तालुक्यातल्या वाण प्रकल्पासाठी ३.३५ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आलं होतं. तिथल्या स्थानिक नागरिकांनी बाळापूर मतदारसंघासाठी पाणी देण्यास विरोध केला होता. अकोटचे भाजपचे आमदार प्रकाश भारसाकले यांनी ही विरोध केला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आमदार भारसाकले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हे पाण्याचं आरक्षण रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ३ मार्चला देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार हे पाण्याचं आरक्षण तात्पुरतं रद्द करण्यात आलं. या संदर्भात फडणवीस यांनी अहवाल मागवला आहे. यामुळे आमदार देशमुख यांनी उपोषणाचं अस्त्र उपासून थेट फडणवीसांना आव्हान दिले आहे.

Akola News : Devendra Fadnavis : Uddhav Thackeray : Nitin deshmukh : Prakash Bharsakle
Thackeray vs Shinde : सत्तासंघर्षावर आज सुनावणी पुर्ण होणार? ; शिंदे गटाचे वकील हरिश साळवेंचा लागणार कस!

आतापर्यंत आमदार देशमुख आणि शिंदे गट गट असा संघर्ष पाहायला मिळत होता. मात्र आता ही लढाई आमदार देशमुख विरू्द्ध फडणवीस, देशमुख विरूद्ध भाजप असा होत आहे. यावर आता भाजप आणि फडणवीसांची भूमिका काय असेल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com