Akola Political News : देशाचं भविष्य असलेल्या तरुणाईने असा केला 'व्हॅलेंटाइन डे' साजरा !

Political Leaders : ‘प्लीज सेव्ह माय व्हॅलेंटाइन' म्हणत घातलं लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाला साकडं.
Akola Youth
Akola YouthSarkarnama
Published on
Updated on

Akola Political News : प्रेमाचा दिवस म्हणून तरुणाई आपल्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलं, असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मात्र अकोल्यात याच तरुणाईने वेगळ्या पद्धतीने 'व्हॅलेंटाइन डे' साजरा केला आहे. अकोल्यातील युवकांनी "माझे पहिले प्रेम माझा जिल्हा" म्हणत जिल्ह्यातील युवकांच्या भविष्याचा जाहीरनामा तयार करण्यासाठी कानाकोपऱ्यातून युवा पिढी एकवटली.

‘सेव्ह माय व्हॅलेंटाइन’चा नारा देत युवकांनी नागरिकांना, लोकप्रतिनिधींना आणि प्रशासनाला आपल्या भविष्याचे ग्रीटिंग कार्ड देऊन हा दिवस साजरा केला. आगामी लोकसभा निवडणूक कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर याच निवडणुकीत महत्वाचा मतदार म्हणून युवकांकडे पाहिले जाते. निवडणुकीत युवकांचे मतदान हे निर्णायक असते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचा या मतदारांवर डोळा असतो.

निवडणूक जवळ आली की, राजकीय पक्ष युवा मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. या निवडणुकीत युवा मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे युवा मतदारांना केवळ मतदानापुरते आकर्षित करण्यात येते. निवडणुकीनंतर युवकांचे प्रश्न बाजूला राहतात. त्यामुळे आगामी निवडणुकीत निर्णायक असलेल्या युवा मतदार आता एकवटला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola Youth
Akola News : राज्यात, केंद्रात भाजपची सत्ता तरी मॉडेल रेल्वे स्टेशन होईना!!

एकीकडे प्रेमाचा दिवस असलेला 'व्हॅलेंटाइन डे' युवक आपल्या जोडीदारांसोबत साजरा करतात. प्रेमाची भावना व्यक्त करतात. अक्षरशः प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलं आहे. निवडणुकीपूर्वी येणाऱ्या या प्रेमाच्या दिवसाला अकोल्यातील तरुणाईनं मात्र वेगळ्या पद्धतीने साजरं केलं आहे.

अकोल्यातील तरुणाई ही बागेत एकवटली मात्र प्रेमाचा दिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी 'आमच्या जिल्ह्यावर आमचं प्रेम आहे.’ असे म्हणत अकोला जिल्हा कसा असावा, यासाठी शेतकऱ्यांचा, कामगारांचा, कलाकारांचा, बेरोजगारांचा, स्पर्धा परीक्षा करणाऱ्यांचा, सर्व विद्यार्थ्यांचा, बंद होणाऱ्या शाळांचा- शिष्यवृत्तीचा- बस सुविधेचा, महाग होणाऱ्या शिक्षणाचा, महिलांच्या असुरक्षिततेचा, शिक्षक-प्राध्यापक-पोलिस-नोकर भरतीचा, शासकीय वसतिगृह आणि अभ्यासिकांचा, अंगणवाडी आणि आशा सेविकांच्या पगाराचा, आरोग्य व्यवस्थेचा, स्वच्छता आणि महिला शौचालयाचा तसेच सर्व सोयीसुविधांचा- सामान्य जनतेच्या हक्कांचा प्रश्न डोळ्यासमोर ठेवून "अकोल्याचा युवा जाहीरनामा" तयार करण्यासाठीच्या या उपक्रमाला आज व्हॅलेंटाइन डे पासून तरुणांनी सुरुवात केली.

यावेळी उपस्थित युवा पाच गटांमध्ये विभागून गटचर्चा करण्यात आली. त्यामधून विविध क्षेत्रांतील समस्या, अडचणी आणि प्रश्न समोर आले. त्यावरती चर्चा करण्यात आली आणि त्या माध्यमातून काही उपाययोजनासुद्धा युवकांनी सुचविल्या. उपक्रमस्थळी अकोला जिल्हा जाहीरनाम्यासाठीच्या सूचनांसाठी सूचनापेटी ठेवण्यात आली होती. जमलेल्या प्रत्येकाने आपल्या सूचना या सूचना पेटीमध्ये टाकल्या.

ही सूचनापेटी गावागावांत, शाळा- महाविद्यालयांमध्ये घेऊन फिरणार असल्याचे सांगण्यात आले. त्या माध्यमातून ज्याही सूचना येतील त्यावर आधारित अकोल्याचा जाहीरनामा तयार करण्यात येणार आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना मानवंदना अर्पण करून उपक्रम सुरू करण्यात आला. पुढे हा उपक्रम भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी फासावर जाऊन क्रांतीची मशाल पेटविली म्हणून 23 मार्च या दिवशी अकोल्याचा युवा जाहीरनामा पूर्ण तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना देऊन जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Akola Youth
Akola Shiv Sena : रस्त्याच्या मागणीसाठी बांधकाम कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

हा जाहीरनामा अकोल्याचे आणि युवकांचे भविष्य निर्धारित करणारा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार असल्याचे मत युवकांनी व्यक्त केले. दरम्यान एकवटलेल्या युवकांनी अकोल्यातील बस स्थानक, भाजी बाजार, कपडा मार्केट, अशोकवाटिका, चिव-चिव बाजार, नागरिकांना तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, महानगर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद यामधील लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांना 'सेव माय व्हॅलेंटाईन' म्हणत गुलाबाचे फुल आणि ग्रिटींग कार्ड देऊन आमचं प्रेम वाचवा अशी हाक युवक-युवतींनी दिली. या उपक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.

Edited By : Atul Mehere

Akola Youth
गृहिणींचा तो बॅनर भाजप नगरसेवकाने फाडला ; बघा अकोल्यात काय घडलं ? | Akola Constituency | BJP |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com