Nitin Deshmukh : ठाकरेंच्या आमदाराच्या संपत्तीची चौकशी; 'ACB'कडून आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या मुलांवरील खर्चाचा शोध...

ACB open inquiry into Nitin Deshmukh assets : लाचलुचपत विभागाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांची मालमत्तेची उघड चौकशी सुरू केली आहे. आमदार देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणावर होत असलेल्या खर्चाचा तपशील शाळेकडे मागणारी नोटीस व्हायरल झाली आहे.
Nitin Deshmukh
Nitin DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांच्या मालमत्तेची उघड चौकशी सुरू आहे. यात लाचलुचपत विभागाच्या चौकशी पथकाने आमदार देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणावर होत असलेल्या खर्चाचा तपशील देखील संबंधित शाळेकडे मागितला आहे.

लाचलुचपत विभागाच्या चौकशी पथकाने संबंधित शाळेला यासंदर्भात दिलेली नोटीस समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार नितीन देशमुख यांची लाचलचुपत विभागाकडून चौकशी सुरू आहे. यात लाचलुचपत विभागाच्या चौकशी पथकाने आमदार देशमुख यांची मुलं शिकत असलेल्या शाळेला नोटीस बजावली आहे. यात आमदार देशमुख यांची मुलं शाळेत दाखल झाल्यापासूनचा खर्च तपशीलवार मागितला आहे.

आमदार देशमुख यांचा मोठा मुलगा दहावीत आहे, तर छोटी मुलगी आठवीमध्ये आहे. मालमत्तेच्या उघड चौकशीपोटी थेट मुलांच्या शिक्षणापर्यंत गेल्याने आणि मुलांच्या शाळेला नोटीस बजावल्याने याचे पडसाद उमटू लागले आहेत. यात ही नोटीस समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे. समाज माध्यमांवर देखील यावर रोष व्यक्त केला जात आहे.

Nitin Deshmukh
Assembly Election Surve : राज्यातील पक्षांचे वेगवेगळे सर्व्हे काय सांगतात; कोणाला बसणार धक्का ?

अडीत तास चौकशी

शिवसेना फुटीनंतर आमदार नितीश देशमुख यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ केली. यानंतर ते सत्ताधाऱ्यांच्या रडावर आल्याचे सांगितले जाते. नितीन देशमुख हे अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अमरावती विभागीय कार्यालयात गेल्या मंगळवारी त्यांची अडीच तास चौकशी झाली. यावेळी शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली होती.

Nitin Deshmukh
Ajit Pawar : लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो,...लयं वंगाळ वाटतंय; अजितदादांनी व्यक्त केली खंत

एकनाथ शिंदेंना इशारा

नितीन देशमुख यांच्याकडे कंपनी, शेत-जमिनी, कारखाने असल्याचा आरोप आहे. तशी लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार आहे. ही तक्रार ज्याने केली आहे, तो सराईत गुन्हेगार असल्याचा आरोप नितीन देशमुख यांनी केला आहे. माजी आमदार, शिवसेना शिंदे गट, भाजपचा त्याला पाठिंबा आहे.

तसंच तक्रारदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संभाषणाची ध्वनिफीत आपल्याला मिळाली आहे, एसीबीला तक्रारदारासंदर्भात माहिती मागितली असून, तक्रारदार तोच आहे, असे निष्पन्न झाल्यास मुख्यमंत्री अन् संबंधित व्यक्तीची ध्वनिफीत उघड करण्याचा इशारा नितीन देशमुख यांनी दिला आहे. आमदार नितीन देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणावरील खर्चाबरोबरच, डिझेल-पेट्रोल खर्चापर्यंत ही माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने मागवली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com