Ajit Pawar : लोकसभेसारखा दणका देऊ नका रे बाबांनो,...लयं वंगाळ वाटतंय; अजितदादांनी व्यक्त केली खंत

Jansanman Yatra : सध्या कांदा आणि टोमॅटोला बरा बाजारभाव आहे. केंद्र सरकारमधील लोकांना सांगितले की, आता निर्यातबंदी करायची नाही. बंदी नाही म्हणजे नाही. केंद्र सरकार आपलं आहे; म्हणून आम्ही हे करणार आहोत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Junnar, 18 August : लोकसभेसारखा दणका नका रे देऊ बाबांनो....लय वंगाळ वाटतंय. एवढं काम करतोय, बेंबीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय. घामेघूम होतोय, तरी सांगतोय. पटवून देतोय. समोरच्यांनी (विरोधकांनी) तुम्हाला काय दिलं.

देवळात वाजवायची घंटातरी दिली का, असा सवाल करत लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा खंत बोलून दाखवली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जुन्नरमधील जनसन्मान यात्रेत (Jansanman Yatra) अजित पवार (Ajit Pawar) यांनी मनातील सल बोलून दाखवली. ते म्हणाले, मला तर तुमचं काय कळतंच नाही. समोरचे काहीही बोलत सुटले आहेत. खोटंनाटं सांगून वाटेल ते आरोप करत आहेत. मागच्या वेळी काही गोष्टी आमच्याकडून चुकल्या ते आम्ही कबूल केले आहे. आज सकाळीच मी, खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि आमदार अतुल बेनके जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेलो होतो.

सध्या कांदा आणि टोमॅटोला बरा बाजारभाव आहे. केंद्र सरकारमधील (Central Government) लोकांना सांगितले की, आता निर्यातबंदी करायची नाही. बंदी नाही म्हणजे नाही. केंद्र सरकार आपलं आहे; म्हणून आम्ही हे करणार आहोत.

Ajit Pawar
Samadhan Avtade : आमदारकीपेक्षा विधानसभा चालविण्याचा आनंद अविस्मरणीय होता; समाधान आवताडे

तुमच्या खासदाराला (डॉ. अमोल कोल्हे) सांगा तर ते म्हणतील, ‘माझं तिथं कोणी ऐकतच नाही’ तिथे जर शिवाजीराव आढळराव पाटील असते तर तसं म्हटले असते का असे? आणि बिनकामाचं माझं डीपीडीसीचं काढतात. डीपीडीसीमध्ये अजित पवार आम्हाला बोलू देत नाहीत. मी इतके वर्षे जिथे पालकमंत्री असून सर्वांना बोलू दिलेलं आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री म्हणाले, अजित पवार आत्ताच वाईट झाला का? आणि यापूर्वी अजित पवारसारखा कर्तृत्ववान माणूस नाही, असे ते म्हणायचे. असले धंदे करणाऱ्यांना कुठंतरी थांबवलं पाहिजे. मी एखाद्या वेळी कडक शब्दांत बोलतो. पण, माझ्या मनात खोट नसते. मी अतिशय स्वच्छ मनाचा माणूस आहे. वेळ मारून नेणारा कार्यकर्ता मी नाही.

Ajit Pawar
Samadhan Avtade : पंढरपूर पोटनिवडणुकीत उमेदवारी निश्चित कशी झाली?; आवताडेंनी सांगितली फडणवीसांसोबतच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी

केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार आलेले आहे. काही गोष्टींची लोकांना भीती वाटते, हे आम्ही त्यांना सांगितले आहे. कायदा आणि सुव्यवस्था चांगली राखण्याचा प्रयत्न आम्ही करतो. ज्या ठिकाणी अन्याय होतो, त्या ठिकाणी आम्ही धावून जातो. नुकसान झालं तर भरपाई देतो. जनतेला वाऱ्यावर सोडत नाही, असा विश्वासही अजित पवार यांनी पुन्हा नागरिकांना दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com