Akola Vikhe Patil News : तुम्हाला मुख्यमंत्री व्हावं वाटतं का? विखे पाटलांनी एकाच वाक्यात सांगितलं !

Rohit Pawar : रोहित पवार लोकप्रियता मिळवण्यासाठी बोलतात, विखे पाटलांकडून अजित पवारांची पाठराखण.
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Akola District Political News : सध्या राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी अनेकांकडून बॅनर, चर्चा, विधाने करून वातावरण तापते ठेवले जात आहे. अशात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री व्हावे वाटत का, या पत्रकारांनी विचारलेल्या या प्रश्नावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकाच वाक्यात उत्तर दिलं आहे. (Rohit Pawar talks to gain popularity, Vikhe Patil's support Ajit Pawar)

'मी महसूलमंत्री म्हणून आनंदी आहे', असं विखे पाटील म्हणाले. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी नगर जिल्ह्यात राधाकृष्ण विखे पाटील नवे मुख्यमंत्री होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील काल (ता. १६) अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान, विखे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डी दौऱ्याबद्दल ही माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा हा २४ तारखेला प्रस्तावित असून, विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यादरम्यान शिर्डी येथील संकुल, विमानतळ विस्तारीकरण भूमिपूजन तसेच शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या चौकशीच्या मागणीवरही विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकरांच्या गौप्यस्फोटानंतर या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी चौकशीची मागणी केली आहे. बोरवणकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 'मॅडम कमिशनर' या पुस्तकातून हे आरोप केले आहेत.

रोहित पवार यांनी या प्रकरणी केलेल्या चौकशीच्या मागणीवर महसूलमंत्री राधाकृष्ण पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करीत रोहित पवार अशी विधाने करून लोकप्रियता मिळवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. अजित पवार यांच्या बाबतीत काही स्वतंत्र चौकशी करण्याची आवश्यकता नसल्याचे विखे पाटील यांनी नमूद केलं.

मी महसूलमंत्री म्हणून आनंदी...

राज्यात सध्या मुख्यमंत्री होण्यावरून चर्चा, विधाने, बॅनरबाजी आदींतून चर्चा रंगली आहे. अनेक नेत्यांचे समर्थकांकडून चर्चा सध्या या विषयावर चर्चा होत असतानाच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मात्र एकाच वाक्यात हा विषय संपवला आहे. विशेष म्हणजे विखे पाटील यांच्या मुख्यमंत्री होण्यावरून नगर जिल्ह्यात चांगलीच चर्चा रंगली होती. पत्रकारांनी विचारले, राधाकृष्ण विखे पाटील यांना मुख्यमंत्री व्हावे, असे वाटते का? त्यावर 'मी महसूलमंत्री म्हणून आनंदी आहे', असे उत्तर विखे पाटलांनी दिले.

Radhakrishna Vikhe Patil
Akola Vikhe Patil News : नव्या पालकमंत्र्यांचा मुहूर्त निघाला, 'श्रीं’चे दर्शन घेऊन होणार 'ॲक्टिव्ह'!

रोहित पवारांना अजून पुष्कळ शिकायचंय...

मिरा बोरवणकर यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी चौकशीची मागणी केली आहे, तर आमदार रोहित पवार यांनीही यावर भाष्य करीत, “माझ्यावर चौकशा सुरू आहेत, तर सत्तेतील लोकांच्या चौकशा सुरू करायला काय हरकत आहे?” असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला आहे. त्यावर रोहित पवार यांना अजून पुष्कळ काही शिकायचं आहे. त्यांनी राजकारणात परिपक्वता आणली पाहिजे. रोहित पवारांनी स्वतःच्या भावनेला आवर घालण्याची आवश्यकता आहे, असेही पाटील म्हणाले.

दादांवरील शाईफेकीचे समर्थन नाहीच...

चंद्रकांत पाटील यांच्यावरील शाईफेक प्रकरणावर विखे पाटील म्हणाले, माझ्यावर भंडारा उधळला तो देवाचा आहे. मला तर पुण्य लाभलं मात्र शाई फेकण्याचा प्रकार जो चंद्रकांतदादांवर झाला आहे. हे योग्य नाही लोकशाही मार्गाने आपल्याला व्यासपीठ आहे. प्रश्न मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे. माध्यमे आहेत, त्यातून आपल्या भावना व्यक्त करू शकतो. मात्र, अशाप्रकारे शाईफेक करणं योग्य नसून याचे समर्थन होऊ शकत नाही, असेही विखे पाटील म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Radhakrishna Vikhe Patil
Akola News : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवरून श्रेयवादाची लढाई; भाजप-काँग्रेस आमनेसामने

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com