Girish Mahajan : फडणवीसांच्या 'संकटमोचका'वर आलं 'संकट', गिरीश महाजनांनी काढाला पळ; नेमकं घडलं काय?

Girish Mahajan Latest News : गिरीश महाजन हे जळगावातील जामनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात. पण, मतदारसंघातील दुरावस्थेवरून प्रश्न विचारल्यावर गिरीश महाजन यांनी त्याकडे लक्ष न देता निघून जाणे पसंत केलं.
girish mahajan.jpg
girish mahajan.jpgsarkarnama
Published on
Updated on

भारतीय जनता पक्ष आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत कोणताही वाद निर्माण झाल्यास सर्वांत पहिल्यांदा मदतीला धावून येणारी व्यक्ती म्हणजे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन. ते जणू फडणवीसांचे संकटमोचक. मात्र, 'संकटमोचक' गिरीश महाजन यांच्यावर 'संकट' येताच पळ काढावा लागला आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

गिरीश महाजन ( Girish Mahajan ) हे जळगावातील जामनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्त्व करतात. मात्र, जामनेरमधील एका गावात गेल्यावर तरूणांनी रस्त्याबाबत जाब विचारला. तेव्हा, 'संकटमोचक'महाजन यांनी पळ काढल्याचा दावा विधान परिषद विरोधी पक्षनेते, अंबादास दानवे यांनी केला आहे. याचा व्हिडिओ दानवे यांनी फेसबूकवर पोस्ट केला आहे.

व्हिडिओत काय?

जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे 'संकटमोचक' महाजन एका कार्यक्रमानिमित्त गेले होते. मात्र, रस्त्याच्या दुरावस्थेवरून तरूणांनी 'संकटमोचक' महाजन यांना जाब विचारला. यानंतर 'संकटमोचक' महाजन हे दुचाकीवरून पळ काढताना दिसत आहेत.

girish mahajan.jpg
Girish Mahajan: नाथाभाऊ आता काय करणार? गिरीशभाऊंनी थेट पुरावेच मागितले!

दानवेंनी काय म्हटलं?

अंबादास दानवे ( Ambadas Danve ) यांनी पोस्टवर लिहिलं, "ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना तरुणांनी विचारला जाब.... जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱ्यानिमित्त गिरीश महाजन आले असता गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरावस्था का ? असे विचारले असता मंत्री महोदयांनी ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता तेथून पळ काढला... जामनेर तालुक्यात एकच चर्चा."

दरम्यान, आंदोलन, बंडखोरी रोखणे असो किंवा फडणवीस यांच्यापर्यंत विषय येऊ लागल्यानंतर संकटमोचक गिरीश महाजन हे पुढे येतात. त्या अडचणीच्या विषयातून गिरीश महाजन हे मार्ग काढतातच. त्यामुळे महाजन यांची ओळख 'संकटमोचक' म्हणून झाली आहे. मात्र, आता तरूणांनी रस्त्याच्या दुरावस्थेवरून जाब विचारल्यानंतर गिरीश महाजन यांना पळ काढावा लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com