Ambedkar on Fadanvis : आंबेडकर भडकले; म्हणाले, देवेंद्र फडणवीसांना इतकी मस्ती कशाची?

Devendra Fadanvis : फडणवीस आणि भाजपच्या या वृत्तीचा शिकार असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.
Devendra Fadanvis and Prakash Ambedkar
Devendra Fadanvis and Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Akola Political News : नागपुरात पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला, तर देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील एका व्हिडिओवरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा धारण केला. (Ambedkar has also accused Fadnavis and BJP of being a victim of this attitude)

याच व्हिडिओवरून विरोधकांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘फडणवीस यांना सत्तेच्या नशेची मस्ती की सत्तेने भ्रष्ट? की दोन्हीची इतकी मस्ती कशी’, असा सवाल करीत जोरदार टीका ‘एक्स’ माध्यमातून आंबेडकर यांनी केली आहे.

हाच प्रकार मी अनेक वेळा बघितला असून, कित्येक वर्षांपासून अकोला फडणवीस आणि भाजपच्या या वृत्तीचा शिकार असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला आहे. नागपूर शहराला नुकताच पुराचा मोठा फटका बसला. त्या दिवशी उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंबई येथे अमित शाह यांच्या दौऱ्यात व्यस्त होते. त्यानंतर नागपुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.

पाहणी दौऱ्यादरम्यान नागपुरातील एका व्यक्तीबरोबर अरेरावी केल्याचा व्हिडिओ रविवारी (ता. २४) सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाला. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने हा व्हिडिओ ‘एक्स’वरून शेअर करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. आता प्रकाश आंबेडकरांनीही फडणवीसांवर जोरदार टीका करीत त्यांचा समाचार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर ?

सत्तेच्या नशेत? सत्तेने भ्रष्ट? की दोन्हीची इतकी मस्ती? असा सवाल करीत आंबेडकर यांनी जोरदार टीका केली. नागपुरात पुरात अडकलेल्या चार निष्पाप लोकांचा बळी गेला आहे आणि त्याची दाद मागण्यासाठी गेलेल्या लोकांना इतकी तृच्छ वागणूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतात. शिवसेना - भाजप - राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चालत असलेल्या सरकारचा मुजोरपणा बरेच काही सांगून जातो.

प्रामाणिकपणे मला याचं आश्चर्य वाटत नाही. हे मी असंख्य वेळा पाहिले आहे. वर्षानुवर्षे अकोल्यात, तर त्यांच्या पालकत्वाखाली आणि भाजपच्या प्रतिनिधित्वाखालील त्यांच्या लोकप्रतिनिधींच्या उदासीन आणि मुजोर वृत्तीचा अंत झालेला आहे, असेही आंबेडकर म्हणाले.

Devendra Fadanvis and Prakash Ambedkar
Akola Former MLA News: आमदारकी गेली तरी स्टिकरचा मोह सुटेना, ‘या’ माजी आमदाराची जिल्हाभर चर्चा !

अकोल्यात भाजप विरुद्ध वंचित असा सामना...

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर हे अकोला लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे स्पष्ट हे. लोकसभा निवडणुकीत भाजपने आंबेडकर यांना धूळ चारली आहे. पुन्हा लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे भाजपला कोंडीत पकडण्यासाठी प्रकाश आंबेडकर एकही संधी सोडत नाहीत.

यापूर्वीही आंबेडकर यांनी अकोल्यातील विकासकामांवरून भाजप लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केलेली आहे. देवेंद्र फडणवीस हे अकोल्याचे पालकमंत्री असून, प्रकाश आंबेडकर यांनी आता नागपूरच्या घटनेवरून अकोला भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

'त्या' व्हिडिओवर भाजपचे स्पष्टीकरण...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील व्हायरल व्हिडिओवरून महाराष्ट्र भाजपने स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व घटनेचा एक व्हिडिओ या वेळी महाराष्ट्र भाजपकडून ‘एक्स’वरून शेअर करण्यात आला आणि स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

Edited By : Atul Mehere

Devendra Fadanvis and Prakash Ambedkar
Akola Fadanvis News : फडणवीसांचा ‘हा’ जिल्हा सोसतोय भारनियमनाचे चटके, कुठे कमी पडली ‘ऊर्जा’?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com