Amol Mitkari : राज ठाकरेंवरील विधानावर ठाम! अमोल मिटकरी नेमके काय म्हणाले?

Raj Thackeray And Akola MNS : पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांतील काही आरोंपीला अटक केलेली आहे. मात्र मुख्य आरोप कर्णबाळ दूनबळे फरार आहे.
Amol Mitkari
Amol MitkariSarkarnama
Published on
Updated on

Akola Political News : अकोल्यात ज्या विधानामुळे हल्ला झाला, त्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ठाम असल्याचे स्पष्ट केले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावर आपण 202 टक्के ठाम आहे.

मनसेतील नेते हे सुपारीबाज, दारू पिणारे, पळ काढणारे असल्याचा पुनरुच्चार मिटकरींनी केला. त्यामुळे मिटकरी - मनसेतील वाद चिघळण्याची शक्यता आहे.

मिटकरी Amol Mitkari यांच्यावर अकोल्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केला होता. त्यात त्यांच्या कारचे नुकसान झाले. हल्ल्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मिटकरींना धमक्याही दिल्या आहेत. दरम्यान, पोलिसांनी हल्ला करणाऱ्यांतील काही आरोंपीला अटक केलेली आहे. मात्र मुख्य आरोप कर्णबाळ दूनबळे फरार आहे.

गुन्हा दाखल असलेले मनसे नेते कर्णबाळांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर ७ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. यावर मिटकरी म्हणाले, कर्णबाळा दूनबळे यांना पोलिस अटक करतील, अशी अपेक्षा आहे. पोलिसांनी अटक न केल्यास पुढील आंदोलनाची दिशा ठरवू, असा इशाराही त्यांनी दिला.

धमक्या देणाऱ्या मनसे नेत्यांचा मिटकरींनी समाचार घेतला. कपडे फाडण्याचा इशारा देणारे खोपकरांना मिटकरींनी, माझ्या एकही बटन उघडला तर त्याची पाठ एका झटक्यात सरळ करीन, असा हल्लाबोल केला. राज ठाकरे हे सुपारी बहाद्दर आहेतच असे आदित्य ठाकरे हेही म्हणाले आहेत. हिम्मत असेल तर त्यांना हात लावून दाखवा, असे आव्हानही मिटकरींनी दिले आहे.

Amol Mitkari
Koregaon Assembly : कोरेगावात रान पेटलं; शिंदे गट - शरद पवार गटात खडाजंगी, काय आहे कारण?

जय राष्ट्रवादीत येणार होता..

मनसे सैनिक जय मालोकार यांच्या मृत्यूची एसआयटी चौकशी व्हावी, अशी मागणी मिटकरींनी केली. जय मालोकार हा राष्ट्रवादीच्या संपर्कात होता. तो काही दिवसांतच राष्ट्रवादीत प्रवेश करणार होता, असेही मिटकरी यांनी यावेळी सांगितले.

कर्णबाळांचा अटक पूर्व जामीनासाठी अर्ज

आमदार मिटकरी यांच्यावर हल्ल्याच्या प्रयत्न आणि गाडीची तोडफोड प्रकरणातील मुख्य आरोपी कर्णबाळा दूनबळेंसह 21 जणांवर अकोला सिव्हिल लाईन्स पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. कर्णबाळा दूनबळे यांनी अटक पूर्व जामीनासाठी अकोला जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर 7 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या प्रकरणात अकोला पोलिसांनी एकूण 12 मनसैनिकांना अटक केलेली आहे.

Amol Mitkari
Maharashtra Sugar Factory : विधानसभेपूर्वी शिंदे-फडणवीस-पवारांची कारखान्यांतून 'मतपेरणी'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com