अमोल मिटकरींचा महाआघाडीला इशारा; भाजप विरोधात एकत्र या अन्यथा...

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष वेगवेगळे लढले तर याचा परिनाम होतो.
Amol Mitkari
Amol Mitkarisarkarnama
Published on
Updated on

अकोला : अकोल्यातील कुटासा जिल्हा परिषदेची जागा राज्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांच्या प्रहार संघटनेने जिंकली आहे. त्यांना ही जागा जिंकण्यासाठी भाजपने मदत केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. भाजप विरोधात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्यास, सत्ता येण्याचा दावाही त्यांनी केला.

Amol Mitkari
एनसीबीच्या पथकात भाजपचे पदाधिकारी; नवाब मलिकांचा गौप्यस्फोट

कुटासा सरकलमध्ये २ हजार ६५० मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळली. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार तीसऱ्या क्रमांकावर राहिले. भाजप उमेदवाराला १ हजार ८०० मते मिळाली. त्यामुळे ते चौथ्या क्रमंकावर राहिले. येथे भाजपला जास्त फटका बसला, असा दावा मिटकरी यांनी केला. पालक मंत्री बच्चु कडू यांच्या प्रहार संघटनेचा उमेदवार येथे विजयी झाला. काँग्रेस सोबत आली असती तर आम्ही वंचीत बहुजन आघाडीला रोखू शकलो असतो, असेही मिटकरी यांनी सांगितले.

Amol Mitkari
चार वर्षांच्या मुलीनं काढलेल्या ईश्वरचिठ्ठीनं ठरवलं काँग्रेस अन् शिवसेनेच्या उमेदवाराचं भविष्य

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष वेगवेगळे लढले तर याचा परिनाम होतो. आता महानगर पालिकेतही तीनचा प्रभाग झाला आहे. भाजपला टक्कर द्यायची असलेत तर सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. अकोला जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या १४ जगांवर निवडणुक झाली. त्यामध्ये ठरले होते की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने चार जागा लढवायच्या व दोन जागा बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला सोडायच्या, असे घडले असते तर वंचीत बहुजन आघाडीला रोखता आले असते, असे मिटकरी यांनी सांगितले.

वंचित बहुजन आघाडीला 6 जागा मिळाल्या आहेत. वंचित समर्थक दोन सदस्य होते, त्यामध्ये एक जण विजयी झाला आहे. भाजपच्या दोन जागा कमी झाल्या, तर राष्ट्रवादीची 1 जागा वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com