सदाभाऊंच्या XXX ला का आग लागली?

माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीका केली होती.
NCP on Sadabhau Khot, Amol Mitkari News
NCP on Sadabhau Khot, Amol Mitkari Newssarkarnama
Published on
Updated on

मुंबई : माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या टीका केली होती. पवार साहेब महान नेते आहेत. त्यांनी या राज्यामध्ये काड्या करण्यापलीकडे काही केले नाही. त्यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचे कार्य केले. त्यामुळे शरद पवारांचे आडनाव बदलून 'आगलावे' करावे, असे खोत म्हणाले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) खोत यांचा जोरदार समाचार घेतला आहे. (NCP on Sadabhau Khot)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो (Clyde Crasto) यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, सत्तेपासून उपाशी असलेल्या सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याने ते बरळू लागले. सदाभाऊ खोतांचे 'उपाशी खोत' असंच नामकरण करण्याची गरज आहे. भाजपच्या वळचणीला येऊन सत्तेत मंत्रीपद भोगलेले सदाभाऊ खोत यांना सत्ता गेल्यानंतर काहीच सुचेनासे झाले आहे, असा टोलाही क्लाईड क्रास्टो यांनी लगावला. शरद पवारसाहेब महाविकास आघाडीचे प्रणेते ठरल्यानेच खोत त्यांच्यावर बरळू लागले आहेत. त्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मात्र, त्यांची पवारसाहेबांवर बोलण्याइतपत लायकी नाही. हे पहिले लक्षात ठेवावे, असा स्पष्ट इशाराही क्लाईड क्रास्टो यांनी दिला.

NCP on Sadabhau Khot, Amol Mitkari News
पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा कळले नाही!

सदाभाऊ खोत यांची आमदारकी जात आहे, त्यामुळे आमदारकी टिकवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न, असल्याचे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले. महाराष्ट्रात घरा घरात आग लावण्याचे काम भाजप कसे करते, हे अवघ्या देशाला माहित आहे. 'काश्मिर फाईल्स'च्या माध्यमातून दोन धर्मात आग लावण्याचा प्रयत्न केला. सदाभाऊची गत पाण्याविना मासोळी अशी झाली आहे. पवार साहेबांनी काय केले, यापेक्षा सदाभाऊंच्या XXXला का आग लागली? हे शोधणे महत्त्वाचे, अशा शकल्या शब्दांत मिटकरी यांनी खोत यांच्यावर तोफ डागली.

NCP on Sadabhau Khot, Amol Mitkari News
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

राज्यातील सर्व ऐतिहासिक पुतळ्याचे उद्घाटन पवार साहेबांनी केले. पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar memorial) यांच्या स्मारकाचे उद्घाटन करुन सदाभाऊ यांनी पाप केले. तीन पक्षाचे सरकार आहे. भाजपचे एका पक्षाचे सरकार असतानाही कुजबुज होत होती. आता तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात काही निधी कमी दिला गेला असेल. म्हणून त्यांनी बोलून दाखवले. एखाद्याच्या बोलण्याने महाविकास आघाडीत गोंधळ आहे, असे होत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com