
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अवघ्या दीड महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेल्या अमरावती विमानतळाला पहिल्याच पावसाचा फटका बसला. विमानामध्ये पेट्रोल भरणारा टँकर विमानतळावरील चिखलात फसल्याने अमरावती ते मुंबई विमान ऐनवेळी रद्द करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांचा संताप अनावर झाला. सोमवारी (26 मे) सायंकाळी हा प्रकार घडला.
16 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते अमरावती विमानतळाचे उद्घाटन झाले. त्यानंतर मुंबईसाठी विमान सेवा सुरू करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे सायंकाळी साडेचारच्या सुमारास 74 प्रवासी याच विमानाने मुंबईला जाणार होते.
त्यानुसार पायलटने प्रवाशांना विमानात बसण्याची परवानगी दिली. प्रवाशांनी आपले सीटबेल्ट सुद्धा बांधले. विमान निघण्यापूर्वी विमानतळावर टँकरद्वारे पेट्रोल भरले जाते. सोमवारीही नियोजनाप्रमाणे टँकर पेट्रोल भरण्यासाठी धावपट्टीवर उभ्या असलेल्या विमानाच्या दिशेने निघाला. पण टँकर चिखलात फसला. त्यामुळे नियोजित वेळेत विमानात पेट्रोल भरता आले नाही.
याचदरम्यान पायलट कॉकपीटमधून बाहेर आला आणि त्याने सर्व प्रवाशांना विमानाखाली उतरवले. सायंकाळ झाल्याने आणि नाईट लँडिंगची सुविधा नसल्यामुळे विमान उड्डाण करणार नसल्याचे त्याने प्रवाशांना सांगितले. यानंतर सर्व प्रवासी विमानतळ परिसरात जमले. अनेकांनी विमानतळ प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांशी वाद घालणे सुरू केले. मात्र, त्याचा काही एक फायदा झाला नाही.
एका विद्यार्थ्याची मंगळवारी सकाळी मुंबईत परीक्षा असल्याने त्याने तातडीने नागपूर विमानतळ गाठले. तर एका महिलेला तातडीने गुवाहाटीला जायचे असल्याने तिनेही पायलटशी वाद घातला. आम्ही नियोजित वेळी विमानतळावर पोहोचलो. मात्र, आधी पेट्रोलचा टँकर चिखलात फसल्याचे आणि नंतर अंधार पडल्याचे कारण देत पायलटने विमान उडविण्यास असमर्थता व्यक्त केली, अशी माहिती विमानातील प्रवासी सुरेशराव बदुकले यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.