Amravati DCC Bank: बच्चू कडूंना विधानसभेला धूळ चारलेला नेता पुन्हा मैदानात : भाजप आमदाराकडून जिल्हा बँकेसाठी पॅनेलची तयारी

Amravati District Politics: अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार प्रवीण तायडे यांनी तिसरे पॅनेल उतरविण्याचे संकेत दिले. बँकेचा कारभार पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त करण्याला प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Pravin Tayde, Bachchu Kadu
Pravin Tayde, Bachchu KaduSarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati News : अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणुकीची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झाली नसली, तरी विविध राजकीय गटांकडून पॅनेल बांधणीला सुरुवात झाली आहे. बच्चू कडू आणि नेते अभिजित ढेपे यांच्या गटाला आव्हान देण्यासाठी काँग्रेस नेते आणि अन्य दिग्गजांचीही तयारी सुरू असताना, आता अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनीही स्वतंत्र पॅनेल उतरवण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरलेला नसला तरी पॅनेलची जुळवाजुळव सुरू आहे. त्यातच आता दोन परस्परविरोधी पॅनेलमध्येच तिसऱ्या दिग्गज नेत्यानेसुद्धा निवडणूक रिंगणात उतरविण्याचे संकेत दिले आहेत. विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा बॅंकेवर सध्या प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काँग्रेसचे नेते बबलू देशमुख, माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, खासदार बळवंत वानखडे, राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांचा समावेश असलेल्या बलाढ्य पॅनेलला आव्हान देत आमदार बच्चू कडू व सहकार नेते अभिजित ढेपे यांनी सत्ता खेचून आणली होती. त्यानंतर या दोन्ही गटांमध्ये वेळोवेळी संघर्षाची ठिणगी पडली.

Pravin Tayde, Bachchu Kadu
Eknath Shinde: दसरा मेळाव्याआधीच शिंदेंचा मोठा निर्णय; राष्ट्रवादीतून आलेल्या माजी खासदारावर सोपवली महत्त्वाची जबाबदारी

आता जिल्हा बॅंकेची निवडणूक होऊ घातल्याने या दोन पॅनेलमध्ये पुन्हा टस्सल पाहायला मिळणार, असा अंदाज व्यक्त होत असतानाच बच्चू कडू यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत केलेल अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनीसुद्धा तिसरे पॅनेल उतरविण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. जिल्हा बॅंकेची अंतिम मतदारयादी जाहीर झाल्याने आता कुठल्याही क्षणी निवडणुकीचा बिगूल वाजण्याची शक्यता आहे.

Pravin Tayde, Bachchu Kadu
Gokul Election : स्थानिक स्वराज्य संस्था, शक्तिपीठविरोधी लढा अन् आता गोकुळ; एकाकी पडलेल्या सतेज पाटलांना राजू शेट्टींची खंबीर साथ!

याबाबत बोलताना आमदार तायडे म्हणाले, अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडीच वर्षांच्या काळात मनमानी कारभार चालला. संगणक खरेदी, नूतनीकरणावर कोट्यवधींची उधळण करण्यात आली. त्याचा कुठेही हिशोब नाही, मात्र आता यापुढे शेतकऱ्यांच्या या बँकेचा कारभार पारदर्शकपणे, भ्रष्टाचाररहीत चालावा, यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. पॅनेलचे वेळेवर पाहू, मात्र आधी बॅंकेत चांगली मंडळी निवडून देण्याला आमचे प्राधान्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com