Amravati Politics : शहरातील कचऱ्यावरून राजकारण तापलं, कचरा वाहनांचं कंत्राट कुणाच्या बगलबच्च्यांचं? भाजपचा काँग्रेसला सवाल

Political Storm in Amravati : महापालिकेची निवडणूक जवळ येताच अमरावती जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शा‍ब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे. नेहरू मैदानावरच्या कचरा हे यास निमित्त ठरले आहे. येथील कचऱ्यावरून काँग्रेसने भाजपला आव्हान दिले होते.
BJP VS Congress
BJP VS CongressSarkarnama
Published on
Updated on

Amaravati News, 17 Oct : महापालिकेची निवडणूक जवळ येताच अमरावती जिल्ह्यात भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये शा‍ब्दिक खडाजंगी सुरू झाली आहे. नेहरू मैदानावरच्या कचरा हे यास निमित्त ठरले आहे. येथील कचऱ्यावरून काँग्रेसने भाजपला आव्हान दिले होते.

त्यास प्रतिआव्हान देऊन भाजपने महापालिकेतील कचरासेठना कुणाचे अभय आहे? शहरातील जमिनी कुणी ढापल्या? असे प्रश्न केले आहेत. नेहरू मैदानासंदर्भात मंगळवारी शहर काँग्रेसने पत्रकार परिषद घेत भाजपला आव्हान दिले होते. त्यावर भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. नितीन धांडे, प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेतून भूमिका मांडली.

धांडे म्हणाले की, 12 ऑक्टोबरलाच आम्ही पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर 13 ऑक्टोबरला खूद्द पालकमंत्र्यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. मैदानावर बांधकाम करता येणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर आता काँग्रेसने याविषयाला फाटे फोडू नये. तर प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी शहरातील साफसफाईच्या विषयाला हात घालत महापालिकेतील कचरासेठना कुणाचे अभय आहे.

BJP VS Congress
Santosh Khandekar : जालना महापालिका आयुक्तांना अटक; 10 लाखांची लाच घेताना ACB रंगेहाथ उचललं

कचरा वाहनांचं कंत्राट कुणाच्या बगलबच्च्यांचं आहे, हे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारून अमरावतीकर जनतेला उत्तर द्यावे, असे प्रतिआव्हान दिले. त्यांच्यात ती हिंमत आहे का? असा प्रश्नही केला आहे. निवडणुकीत पराभव होणार, या मानसिकतेने काँग्रेसने या मुद्द्यावर राजकारण सुरू केले आहे.

काही चेहरे पराभवाच्या भीतीने पछाडले असून कोणी तिकीट देते का याचा शोध ते घेत असल्याचा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. अमरावती महापालिकेच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी होण्याची शक्यता धूसर आहे. महायुतीवरून यापूर्वी आमदार संजय खोडके आणि भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली आहे.

BJP VS Congress
BJP Politics : 'अब की बार 70 पार', ठाण्यात भाजपचा स्वबळाचा नारा, एकनाथ शिंदेंना घेरलं!

त्यातच मुख्यमंत्र्यानी दोन दिवसांपूर्वी शक्य तिथे युती करून अन्यथा मैत्रीपूर्ण लढू असे जाहीर केले आहे. हे सांगताना त्यांनी सर्वांनाच निवडणूक लढायची असल्याची असल्याने युती करणे अवघड असल्याचे संकेतही दिले. वेगवेगळे लढलो तरी एकमेकांवर टिकाटीपणी टाळण्याचा सल्ला दिला आहे. असे असले तरी अमरावतीत राजकीय खडाजंगी अटळ असल्याचे दिसून येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com