Bhushan Gavai mother comment : निवडणुका 'बॅलेट पेपर'वरच व्हाव्यात; सरन्यायाधीश पदाची शपथ घेणारे न्यायमूर्ती गवई यांच्या आईची ईच्छा!

Kamala Gavai Demands Ballot Paper Elections Before Son Bhushan Gavai Takes Oath as CJI : अमरावतीमधील भूषण गवई सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार असून, त्यावर त्यांची आई कमलाबाई गवई यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
Kamla Gavai elections comment
Kamla Gavai elections commentSarkarnama
Published on
Updated on

Kamla Gavai elections comment : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सर्वाधिक चर्चेत आले ते 'EVM' मशीन!विरोधकांनी पराभवाचे खापर 'EVM' मशीनवर फोडलं. काँग्रेस आघाडीने 'EVM' मशीनच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगाला घेरलं. यातच अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं देखील 'EVM' मशीन हॅक होऊ शकतं, असं निरीक्षण नोंदवल्यानं देशातील निवडणुकांबाबत अधिकच प्रश्नचिन्हं उपस्थित झाले.

सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी अमरावतीचे न्यायमूर्ती भूषण गवई आज शपथ घेणार आहेत. तत्पूर्वी त्यांच्या आई कमला यांनी देशातील निवडणुकांबाबत दिलेल्या प्रतिक्रियेनं वादळ उभं झालं आहे.

देशात 'EVM' मशीनचा मुद्दा गाजत आहे. याबाबत गवईसाहेबांनी निर्णय घेतला पाहिजे का? असा प्रश्न कमला गवई यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर कमला गवई म्हणाल्या, "मी त्यांची आई आहे. परंतु तो त्या खुर्चीत बसल्यावर त्याला योग्य वाटेल तो निर्णय घेईलच. एक सामान्य स्त्री म्हणून आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये लोकांनाच केंद्रबिंदु ठेवलेलं आहे. लोकांमधील एक व्यक्ती म्हणून, तु्म्हाला मी काय सांगणार आहे, हे माहिती आहे. परंतु तुमची इच्छाच असेल, तर बॅलेट पेपर कधीही चांगले आहे. पूर्वी देखील बॅलेट पेपरवरच निवडणुका व्हायच्या".

Kamla Gavai elections comment
Shirdi Sai Sansthan : भाविकांच्या दानानं साईंची झोळी भरली; सोन्याच्या सिंहासनासह मौल्यवान दागिने ठेवायला संस्थानला जागा अपुरी पडली!

कमला गवई यांनी आपण एक गृहिणी असल्याचे सांगताना न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या लहानपणाची आठवण सांगितली. घरातील ज्येष्ठ मुलगा असल्याने तो लहान वयातच परिपक्व झाला. 1971 मध्ये झालेल्या भारत (India)-बांग्लादेश युद्धादरम्यान अमरावतीच्या फ्रेजारपुरा भागात सैनिकांसाठी भाकरी बनवायला मदत करायचे, अशी आठवण कमला गवई यांनी सांगितली.

Kamla Gavai elections comment
Eknath Khadse On Drug Case : ड्रग्स प्रकरण वेगळ्या वळणावर, सत्ताधाऱ्यांचा एक स्वीय सहायक दडपतोय; एकनाथ खडसेंच्या दाव्यानं चर्चेला तोंड फुटलं!

न्यायमूर्ती संजीव खन्ना त्यांच्या सहा महिन्यांच्या कार्यकाळानंतर सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी न्यायमूर्ती भूषण गवई यांची नियुक्ती करण्यात आली असून, 52 वे सरन्यायाधीश म्हणून ते उद्या बुधवारी शपथ घेत आहेत. वयाच्या 25 वर्षी वकिली सुरू केलेले भूषण गवई यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मुख्य सरकारी वकील म्हणून कार्यभार स्वीकारताना, स्वतःच्या मर्जीने सरकारी वकिलांचा चमू निवडण्याची अट घातली होती.

न्यायमूर्ती गवई यांचे वडील रामकृष्ण गवई हे आंबेडकरी चळवळीच्या प्रमुख नेत्यांपैकी होते. अमरावतीचे खासदारपद व पुढे बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपाल भूषवले. वडील राजकारण, समाजकारणात सक्रिय असल्याने न्यायमूर्ती भूषण गवई यांना बालपणापासूनच सामाजिक कार्याचा वारसा लाभला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com