Ashok Chavan Resignation : यशोमती ठाकूरांबाबत रवी राणांचा खळबळजनक दावा

Yashomati Thakur : अशोक चव्हाण यांना भाजपने ब्लॅकमेलिंग करून फोडले.
Ravi Rana & Yashomati Thakur
Ravi Rana & Yashomati ThakurSarkarnama

Maharashtra Politics : काँग्रेसचे दिग्गज नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. अशात काँग्रेसचे 10 ते 15 आमदार सातत्याने भाजपच्या संपर्कात असून, यात अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांचाही समावेश असल्याचा खळबळजनक दावा बडनेऱ्याचे आमदार रवी राणा यांनी केला आहे. राणा यांच्या या दाव्यामुळे काँग्रेस वर्तुळात चर्चांना पेव फुटले आहे.

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह 15 फेब्रुवारीला विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. अशात शाह यांच्या दौऱ्याच्या काळात महाराष्ट्रात अनेक मोठे राजकीय भूकंप होतील, असे संकेतही राणा यांनी दिले आहेत.

Ravi Rana & Yashomati Thakur
Amravati Political News : अमरावतीत राजकारण तापलं ; आमदार रवी राणा - ठाकरे गटातला वाद चिघळला; 'या' नेत्याचा पुतळा जाळला

आपण यापूर्वीही सांगितले होते की, महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार आहे. 15 फेब्रुवारीला भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहेत. अशात अनेक मोठे धक्के राजकीय वर्तुळात बघायला मिळणार आहेत. 15 तारखेपर्यंत हे चित्र अधिक स्पष्ट होईल. लोकसभा निवडणुकीपर्यंत महाराष्ट्रातील चित्र पूर्णपणे बदललेले दिसेल, असेही रवी राणा म्हणाले.

आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे आमदार त्यांना सोडून केव्हाच निघून गेले आहेत. शरद पवार गटही जवळपास रिकामा झाला आहे, परंतु लवकरच काँग्रेससह उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटातही कोणी उरणार नाही, असा गौप्यस्फोट राणा यांनी केला. या दोन्ही नेत्यांसह संपूर्ण काँग्रेस पक्ष रिकामा होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्धव ठाकरे यांची स्थिती फारच बिकट होणार आहे. त्यांना तोंड दाखवायलाही जागा उरणार नाही, अशी टीका रवी राणा यांनी केली.

नवनीत राणा व्यस्त

महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये राजकीय उलथापालथ सुरू असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा या मतदारसंघातील आपल्या कामात व्यस्त आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतून नवनीत राणा यांचे नाव पुढे आल्याने त्यांनी आता मतदारसंघात प्रचाराचा धडाका लावला आहे. अशात लोकसभा निवडणुकीचा काळ जवळ येत असल्याने नवनीत राणा यांचे गावागावांतील दौरे आणि भेटींची संख्या चांगलीच वाढली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Ravi Rana & Yashomati Thakur
Abhishek Ghosalkar : पुरोगामी महाराष्ट्राला डाग लावला; यशोमती ठाकूर कुणाबद्दल बोलल्या..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com