BJP-MIM Alliance : हिंदू शेरणीच्या जिल्ह्यातच भाजपची MIM सोबत युती : नाही, नाही म्हणत एकत्र सत्तेत : पालिकेतील राजकीय गणितं फिरली

BJP-MIM Alliance : अकोट नगरपालिकेनंतर अचलपूर नगरपालिकेतही भाजप आणि एमआयएम युती सत्तेत आली असून, मतदान टाळत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यात भाजपला यश आले आहे.
BJP and AIMIM leaders during discussions for power-sharing in Achalpur Municipal Council.
BJP and AIMIM leaders during discussions for power-sharing in Achalpur Municipal Council.Sarkarnama
Published on
Updated on

BJP-MIM : अकोट नगरपालिकेनंतर आणखी एका नगरपालिकेत भाजपसोबत एमआयएम सत्तेत आली आहे. अमरावतीच्या अचलपूर नगरपालिकेत भाजप आणि एमआयएमने युती केली आहे. एकमेकांना साथ देऊन मतदान टाळून काँग्रेसला लांब ठेवण्यात भाजपला यश आले आहे. हिंदू शेरणी अशी ओळख असलेल्या भाजप नेत्या, माजी खासदार नवनीत राणा यांच्या जिल्ह्यातच भाजपने केलेली ही अभद्र युती सध्या राज्यभरात चर्चेत आहे.

अचलपूरच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या रुपाली माथने विजयी झाल्या आहेत. तर काँग्रेस 15, भाजप 9, प्रहार 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2, एमआयएम 3 आणि 10 अपक्ष विजयी झाले. यानंतर प्रहार आणि काही अपक्षांनी त्यांचा गट स्थापन केला. तर उरलेल्या अपक्षांनी, एमआयएमच्या 3 आणि राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांनी त्यांचा स्वतंत्र गट स्थापन केला.

उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला एमआयएम आणि अपक्षांनी पाठिंबा दिल्यानंतर खुर्शीदा बानो विराजमान झाल्या. त्यानंतर विषय समित्यांसाठी काँग्रेससोबत झालेली चर्चा अपयशी ठरली. त्यामुळे अपक्ष, एमआयएम आणि राष्ट्रवादीच्या गटाने भाजपसोबत चर्चा केली. यानुसार काँग्रेसला लांब ठेवत भाजप, अपक्ष आणि एमआयएमच्या गटाने विषय समित्या वाटून घेतल्या. एकमेकांना साथ देऊन मतदान टाळून काँग्रेसला लांब ठेवण्यात भाजपला यश आले आहे. या युतीमध्ये एमआयएमच्या नगरसेवकाला शिक्षण आणि क्रिडा समितीचे सभापतीपद मिळाले आहे.

BJP and AIMIM leaders during discussions for power-sharing in Achalpur Municipal Council.
MIM सोबत युती केलेल्या भाजप आमदाराला मोठा दणका; CM फडणवीस, रवींद्र चव्हाणांच्या नाराजीचा कडेलोट

यापूर्वी अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेतही भाजप आणि एमआयने केलेल्या युतीची राज्यभरात चर्चा झाली. सर्वच पातळीवरून या अभद्र युतीवर टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने ही युती तोडण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. आता अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांच्यावर भाजप काही कारवाई करणार का? हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com