Kirit Somaiya: आयुक्तांचा बचाव करणारे महापौर सापडले अडचणीत! भाजप नेते किरीट सोमय्यांची बैठक ठरतेय वादग्रस्त, चौफेर टिकेचा भडीमार

Kirit Somaiya: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत महापालिकेत आयोजित बैठकीवरून उफाळून आलेला वाद महापौरांनी शांत करण्याचा प्रयत्न केला.
Amaravati Municpial Corporation
Amaravati Municpial Corporation
Published on
Updated on

अमरावती : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत अमरावती महापालिकेत आयोजित बैठकीवरून उफाळून आलेला वाद महापौरांनी शांत करण्याचा प्रयत्न केला. ही बैठक आपल्या पत्रावर आयोजित करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण देत त्यांनी महापालिका आयुक्तांचा बचाव करण्याचा प्रयत्न करतानाच स्वतःवर संकट ओढावून घेतलं आहे. सोमय्या यांच्याकडं संवैधानिक पद नसताना त्यांच्या पत्रावर बैठक कशी काय आयोजित केल्या गेली? असा वाद निर्माण झाला आहे.

Amaravati Municpial Corporation
Imtiaz Jaleel: पवित्र रमजान महिन्यानिमित्त तुरुंगात कैद्यांना मिळणार 'या' विशेष सुविधा; इम्तियाज जलील यांच्या मागणीनंतर प्रशासनाचा निर्णय

१७ फेब्रुवारीस किरीट सोमय्या यांनी महापालिकेत पोलिस अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांची जन्म-मृत्यू दाखल्याच्या मुद्द्यावर बैठक बोलविण्याचं पत्र महापौर श्रीचंद तेजवाणी यांना पाठविले होते. त्यांच्या पत्रावरून २० फेब्रुवारीस महापालिकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी, सभागृह नेते चेतन गावंडे तसेच पालिका आयुक्त सौम्या शर्मा-चांडक, पोलिस आयुक्त कार्यालयाचे घुगे व आडे, जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा निबंधक डॉ. पारिसे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, उपनिबंधक जन्म-मृत्यू डॉ. प्रतिभा आत्राम तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत किरीट सोमय्या यांनी जन्म-मृत्यू नोंदी संदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला.

Amaravati Municpial Corporation
Closed Govt Schemes: निवडणुकीच्या तोंडावर योजनांच्या खैराती! किती बंद पडल्या? भास्कर जाधवांनी यादीच दाखवली वाचून

ही बैठक आता चांगलीच वादात सापडली आहे. किरीट सोमय्या यांच्याकडे कोणतेही संवैधानिक पद नसताना ते बैठक आयोजित करण्यास कसे काय सांगू शकतात? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. तर ही बैठक आयुक्तांनी कशी काय आयोजित केली? असाही सवाल केल्याने वाद चांगलाच गाजू लागला आहे. दरम्यान, महापौर श्रीचंद तेजवाणी यांनी याप्रकरणात मनपा आयुक्तांचा बचाव करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ती बैठक माझ्या पत्रावर आयोजित करण्यात आली होती, असे पत्र त्यांनी दिल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. तथापि, संवैधानिक पदावर नसलेल्या व्यक्तीच्या पत्रावर प्रशासनाची बैठक आयोजित करता येते का? असा प्रश्न मात्र कायमच आहे. यामुळं आता महापौर वादात अडकले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com