Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel

Imtiaz Jaleel: पवित्र रमजान महिन्यानिमित्त तुरुंगात कैद्यांना मिळणार 'या' विशेष सुविधा; इम्तियाज जलील यांच्या मागणीनंतर प्रशासनाचा निर्णय

Imtiaz Jaleel: भविष्यातही अशा संवेदनशील विषयांवर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Published on

संभाजीनगर : मुस्लिम समाजाचा पवित्र रमजानचा महिना सध्या सुरु आहे. यानिमित्त आपला धार्मिक अधिकार प्रत्येकाला बजावता यावा या अनुषंगान तुरुंगात असलेल्या मुस्लिम कैद्यांना विशेष सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हर्सुलच्या मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडं केली होती. त्यांची ही मागणी प्रशासनानं मान्य केली असून त्यानुसार, या कैद्यांना तुरुंगात विशेष सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Imtiaz Jaleel
Closed Govt Schemes: निवडणुकीच्या तोंडावर योजनांच्या खैराती! किती बंद पडल्या? भास्कर जाधवांनी यादीच दाखवली वाचून

जलील यांची मागणी काय?

जलील यांनी तुरुंग प्रशासनाकडं पत्राद्वारे मागणी केली होती की, रमजान या पवित्र महिन्यात हर्सूल येथील मध्यवर्ती कारागृहात कैदेत असलेल्या मुस्लिम कैद्यांना इफ्तारीसाठी फळं उपलब्ध करून द्यावीत तसंच नमाज अदा करण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी. या पत्रात रमजान काळात रोजा ठेवणाऱ्या कैद्यांच्या धार्मिक गरजांकडं मानवीय दृष्टिकोनातून पाहण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती.

Imtiaz Jaleel
Ajit Pawar Smarak: अजित पवारांच्या स्मारकाबाबत विधानसभा अध्यक्षांची मोठी घोषणा! विधानभवन परिसरात उभारणार स्मृतीस्थळ

काय दिल्या सुविधा?

जलील यांच्या या पत्रव्यवहाराची दखल घेत कारागृह प्रशासनाकडून त्यांना अधिकृत उत्तर प्राप्त झालं असून, त्यानुसार रमजान महिन्यात रोजा करणाऱ्या कैद्यांसाठी वेळेवर सेहरी व इफ्तारीची व्यवस्था करण्यात येत आहे. इफ्तारीसाठी फळे व आवश्यक आहार नियमानुसार उपलब्ध करून दिला जात असून, कैद्यांना धार्मिक कर्तव्ये पार पाडण्यासाठी नमाज अदा करण्यासाठी स्वतंत्र बॅरेक/विशेष व्यवस्था देखील करण्यात आली आहे. इफ्तारीच्या वेळेस संबंधित कैद्यांना त्या ठिकाणी आवश्यक सुविधा दिल्या जात असल्याचं कारागृह प्रशासनाच्या उत्तरातून स्पष्ट झाले आहे.

Imtiaz Jaleel
MPs Group: लोकसभा अध्यक्षांचा विश्वास! संजय राऊत, सुप्रिया सुळे, गौरव गोगोई मजबूत करणार भारताचे जागतीक संबंध

लोकप्रतिनिधी व प्रशासनातील समन्वय

हे सर्व निर्णय कारागृहाचे नियम, सुरक्षा व्यवस्था आणि कायदेशीर चौकटीत घेण्यात आले असून, त्यातून कैद्यांच्या धार्मिक भावना जपण्याचा प्रयत्न दिसून येतो. या प्रकरणात घेतलेला सकारात्मक निर्णय हा मानवीय दृष्टिकोनाचा आणि संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मान करणारा असून, यामुळं कैद्यांना रमजानचा पवित्र महिना सन्मानानं व शांततेत पाळण्याची संधी मिळाली आहे. भविष्यातही अशा संवेदनशील विषयांवर लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यातील समन्वय कायम राहावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com