Amravati News: अमरावती शिक्षक मतदारसंघात भाजपच्या 3 नेत्यांचं बंड; शिवसेनेच्या माजी आमदारांनीही थोपटले दंड

Amravati Teachers Constituency Election BJP Rebellion: पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांसह शिक्षक संघटनांचे उमेदवारही मैदानात उतरत आहेत.
Amravati Teachers Constituency Election 2026
Amravati Teachers Constituency Election 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Amravati Teachers Constituency : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारीवरून महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे. अधिकृत उमेदवाराच्या घोषणेपूर्वीच इच्छुक नेत्यांनी स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी सुरू केल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. भाजपकडून शेखर भोयर, संगीता शिंदे आणि महंत सुनील महाराज यांच्या नावांची चर्चा आहे. शिवसेनेचे माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनीही रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांसह शिक्षक संघटनांचे उमेदवारही मैदानात उतरत आहेत.

भाजपकडून संगीता शिंदे आणि शेखर भोयर हे उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. संगीता शिंदे यांच्यासाठी खासदार डॉ. अनिल बोंडे प्रयत्नशील असल्याचे वृत्त आहे, तर शेखर भोयर यांच्यासाठी राज्यमंत्री पंकज भोयर आणि आमदार राजेश वानखडे प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भाजपकडून अधिकृत उमेदवार कोण, याकडे लक्ष लागलेले असतानाच आता महंत सुनील महाराज यांचीही बंडखोरीची भूमिका समोर आली आहे. ते आज, सोमवारी नामांकन अर्ज दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.

Amravati Teachers Constituency Election 2026
Nagpur News: नागपूर पदवीधरमध्ये ट्विस्ट; शरद पवारांच्या पक्षाचे कराळे गुरुजी अपक्ष लढणार? वंजारी-कोहळेंचं टेन्शन वाढलं!

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटातही उमेदवारीवरून संघर्ष सुरू आहे. विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे हे दोघेही या मतदारसंघासाठी इच्छुक आहेत. देशपांडे यांनी पक्षाकडून तसेच अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तरी निवडणुकीतून माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केली आहे.

२०२०च्या निवडणुकीत अपक्ष किरण सरनाईक यांनी शिक्षक आघाडीचे तत्कालीन आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. आता हे दोन्ही नेते शिंदे गटात असल्याने उमेदवारीचा निर्णय पक्षासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे शिंदे गटातही बंडखोरीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Amravati Teachers Constituency Election 2026
TET Result : निकाल रद्दच, पण पुन्हा परीक्षा देता येणार; कोर्टाचा 'त्या' उमेदवारांना मोठा दिलासा

या सगळ्या घडामोडींमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघातील निवडणूक केवळ महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी न राहता बहुकोनी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसने अदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून दत्तात्रय लहाने यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून समोर आले आहे. त्यात महायुतीतील इच्छुक आणि बंडखोर मैदानात राहिल्यास मतविभाजनाचे समीकरणही महत्त्वाचे ठरणार आहे.

Amravati Teachers Constituency Election 2026
PAT 2 Exam 2026: 2 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये परीक्षा; कोणत्या 3 विषयांची होणार चाचणी?

आता ६ ऑक्टोबरपर्यंत कोण उमेदवारी अर्ज दाखल करतो आणि त्यानंतर कोण माघार घेतो, यावर अमरावती शिक्षक मतदारसंघातील अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे पुढील काही तास या निवडणुकीसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com