PAT 2 Exam 2026: 2 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये परीक्षा; कोणत्या 3 विषयांची होणार चाचणी?

PAT 2 Maharashtra: इयत्ता 2 री ते 8 वीच्या विद्यार्थ्यांची नोव्हेंबर 2026 मध्ये संकलित मूल्यमापन चाचणी; भाषा, गणित आणि इंग्रजी विषयांची परीक्षा होणार.
Maharashtra School Exam 2026
Maharashtra School Exam 2026Sarkarnama
Published on: 
Updated on: 

SCERT News : इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये संकलित मूल्यमापन चाचणी-१ (PAT-2) घेण्यात येणार आहे. ही चाचणी नोव्हेंबर २०२६च्या शेवटच्या आठवड्यात आयोजित करण्याचे नियोजन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने केले आहे.

या परीक्षेत प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा म्हणून इंग्रजी या तीन विषयांचा समावेश असेल. इयत्ता दुसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांची या विषयांमध्ये चाचणी घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी अपेक्षित अध्ययन निष्पत्ती कितपत साध्य केली आहे, हे तपासणे आणि त्यानुसार अध्यापन प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करणे हा या मूल्यमापनाचा प्रमुख उद्देश आहे.

विशेष म्हणजे ही चाचणी दहावी किंवा बारावीच्या बोर्ड परीक्षेप्रमाणे नसून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त परीक्षेचा ताण येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. चाचणीच्या निकालाच्या आधारे मागे असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कृती कार्यक्रम आखणे, अध्ययन निष्पत्तीमध्ये सुधारणा करणे आणि शिक्षकांना अध्यापन अधिक परिणामकारक करण्यासाठी दिशा मिळणे अपेक्षित आहे.

Maharashtra School Exam 2026
Gokul Election: गोकुळचे संचालक उमेदवार अडचणीत? 'किकवी प्रकल्प अहवालातील धक्कादायक बाब ठाकरेसेनेकडून उघड

संकलित चाचणी-१ दहा माध्यमांमध्ये घेण्यात येणार असून प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी या विषयांसाठी इयत्तानिहाय प्रश्नपत्रिका असतील. प्रथम सत्रातील अभ्यासक्रम, अध्ययन निष्पत्ती आणि मूलभूत क्षमतांवर प्रश्नपत्रिकांची रचना आधारित असेल.

इयत्ता दुसरीसाठी लेखी व तोंडी परीक्षेसाठी एकूण ३० गुण, तिसरी-चौथीसाठी ४०, पाचवी-सहावीसाठी ५०, तर सातवी-आठवीसाठी ६० गुण असतील. त्यानुसार लेखी व तोंडी परीक्षेसाठी अनुक्रमे ६० ते १२० मिनिटांचा कालावधी असेल. तोंडी परीक्षा लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरूपात घेण्याच्या सूचना आहेत. विद्यार्थी संख्या अधिक असल्यास ती पुढील दिवशी घेता येईल.

Maharashtra School Exam 2026
Teacher Recruitment Scam: शालार्थ आयडी घोटाळ्यात जळगावचा आणखी एक मोठा संस्थाचालक अडचणीत; अटकेची टांगती तलवार

चाचणीच्या प्रश्नपत्रिका अंदाजे २५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर २०२६दरम्यान वितरित केल्या जाणार आहेत. प्रश्नपत्रिकांची सुरक्षितता आणि गोपनीयता राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर राहणार आहे. प्रश्नपत्रिकांचे फोटो काढणे किंवा त्या समाजमाध्यमांवर प्रसारित करणे यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

दरम्यान, चाचणीच्या काळात सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गैरहजर विद्यार्थ्यांची परीक्षा ते शाळेत परतल्यानंतर घेता येईल. चाचणीतील गुणांच्या आधारे विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम राबवून पुढील मूल्यमापनात अध्ययन निष्पत्ती सुधारण्यावर भर दिला जाणार आहे.

Maharashtra School Exam 2026
Diveagar Accident Update: दिवेआगरमध्ये 8 विद्यार्थ्यांचा मृत्यू; आळंदीतील विनर्स अकॅडमीला टाळे, पालक संतप्त, कर्मचारी कुठे?

चाचणीदरम्यान राज्यातील शंभर टक्के शाळांना भेटी देण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तपासलेल्या उत्तरपत्रिकांपैकी १० टक्के उत्तरपत्रिकांची यादृच्छिक पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.

चाचणीचे गुण विद्या समीक्षा केंद्राच्या (VSK) पोर्टलवर नोंदवले जातील. या गुणांच्या आधारे कोणत्याही शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार नसून, माहितीचा वापर विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या अध्ययनविषयक गरजा ओळखण्यासाठी आणि आवश्यक उपाययोजना करण्यासाठीच केला जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com