MLC Election : स्थानिकच्या रणधुमाळीतच भाजपकडून पुढच्या विधानपरिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावा : खासदारांच्या बहिणीसह 3 नावांची चर्चा

MLC Election : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकांदरम्यान भाजपने अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
BJP
BJPSarkarnama
Published on
Updated on

MLC Election : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच भाजपने नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण पुढील आठवड्यात अमरावती शिक्षक मतदारसंघाची आढावा बैठक घेणार असल्याची माहिती आहे. भाजपकडून या निवडणुकीसाठी संगीता शिंदे-बोंडे यांच्यासह अन्य दोन नावांची चर्चा आहे.

अमरावती शिक्षक मतदारासंघामध्ये अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश होतो. मागील निवडणुकीत काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार ॲड. किरण सरनाईक यांनी तत्कालीन आमदार श्रीकांत देशपांडे यांचा अत्यंत चुरशीच्या लढाईत पराभव केला होता. काँग्रेस पक्षाचा दीर्घ कौटुंबिक वारसा सोबतच शैक्षणिक क्षेत्रात आणि स्थानिक राजकारणात सक्रिय असलेले सरनाईक सध्या काँग्रेसकडूनच प्रमुख दावेदार मानले जात आहेत.

दुसरीकडे भाजपकडूनही काही नावांची चाचपणी सुरु आहे. यात प्रामुख्याने संगीता शिंदे-बोंडे, शेखर भोयर आणि प्रा. सुमित पवार यांची नावे आघाडीवर आहेत. संगीता शिंदे-बोंडे या भाजपा शिक्षक आघाडीच्या विभाग संयोजक आहे. शिवाय भाजपे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. शेखर भोयर हे भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य संयोजक आहेत.

BJP
Nashik MLC Election : मंत्री उदय सामंतांनी दुसऱ्यांदा लावला जोर; दराडेंना बिनशर्त पाठिंबा देण्याची गोकुळ गितेंना विनंती

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी सुमित पवार यांनीही दावा केला आहे. ते भाजपचे जिल्हा सरचिटणीस असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. यासोबतच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभाग कार्यवाह आणि राज्यशास्त्र परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शिक्षक परिषदेकडूनही सुमित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.

BJP
MLC Election : "मोहिते पाटलांनी केसाने गळा कापला... फसवणूक केली" : मुलाला डावलताच उत्तमराव जानकरांचे गंभीर आरोप

२०१४ च्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत श्रीकांत देशपांडे यांनी आमदार वसंत खोत्रे यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती. २०२० च्या निवडणुकीत ॲड. किरण सरनाईक यांनी देशपांडे यांना धूळ चारली. यंदा आता किरण सरनाईक यांना हा गड राखण्यात यश मिळणार का? की मागील निवडणुकांचा इतिहास पाहता, मतदार यावेळी देखील नवीन चेहऱ्याला संधी देणार हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com