

Eknath Shinde Shivsena Kiran Sarnaik Leads : अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गेल्या 24 तासांपासून सुरू असून, बुधवारी (28 ऑक्टोबर) सकाळच्या सत्रात निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
महायुतीचे उमेदवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार किरण सरनाईक पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडीवर आहेत. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता न आल्याने दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. त्यामुळे निकालाबाबतची उत्सुकता वाढली आहे.
मतमोजणीच्या 17 व्या बाद फेरीनंतर किरण सरनाईक 3650 मतांच्या फरकाने आघाडीवर असल्याचे चित्र आहे. काँग्रेसच्या (Congress) उमेदवार अदिती पोहरे यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना मागे टाकत दुसरे स्थान मिळवले आहे. त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत कोण बाजी मारणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
17 व्या बाद फेरीनंतरच्या आकडेवारीनुसार, एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) किरण सरनाईक यांना 8575 मते मिळाली आहेत. अदिती पोहरे यांच्या खात्यात 4925 मते जमा झाली आहेत, तर श्रीकांत देशपांडे यांना 4921 मते मिळाली आहेत. पोहरे आणि देशपांडे यांच्यातील मतांचा फरक अवघ्या चार मतांचा असल्याने दुसऱ्या क्रमांकासाठीची चुरसही लक्षवेधी ठरली आहे.
पहिल्या पसंतीच्या मतांमधून कोणालाही विजयासाठी आवश्यक असलेला कोटा गाठता आलेला नाही. त्यामुळे नियमानुसार दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी केली जात आहे. या मतमोजणीनंतरच अंतिम निकाल स्पष्ट होणार आहे.
किरण सरनाईक यांना विजयासाठी आणखी 7559 मतांची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी 16 हजार 134 मतांची आवश्यकता आहे. मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरणार असून, किरण सरनाईक आपली आघाडी कायम राखत विजय मिळवतात की निकालात अनपेक्षित वळण लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.