Congress Corporator Join BJP : सत्तेची साझेदारी! महाराष्ट्रातील राजकारणात नेमकं चाललंय काय? काँग्रेसचा गट भाजपमध्ये विलीन...

Amravati: Congress Corporators Merge with BJP in Warud Municipality Ajit Pawar NCP Leader Devendra Bhuyar Criticises Move : अमरावती जिल्ह्यातील वरूड नगरपालिकेमध्ये भाजप अन् काँग्रेस पुन्हा एकत्र आल्यावरून अजित पवार राष्ट्रवादीने जोरदार टीका केली आहे.
Congress join BJP
Congress join BJPSarkarnama
Published on
Updated on

Warud Municipal Council : अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेस-भाजप, युती झाली होती. यावरून राज्यसह देशात त्याचे पडसाद उमटले. आता असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील वरूड नगरपालिकेत घडला आहे.

काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा गट भाजपमध्ये विलीन झाला आहे. यावरून पुन्हा एकदा अनैसर्गिक युतीमुळे राज्यात राजकारण ढवळून निघू लागलं आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी यावर अनैसर्गिक युतीवर जोरदार टीका केली आहे.

वरूड नगरपालिकेत भाजपला बहुमत आहे. भाजपचे (BJP) 19 नगरसेवक निवडून आले. काँग्रेस दोन, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चार, प्रहारचा एक आणि अपक्ष एक, असे नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपला वरूड नगरपालिकेत पूर्ण बहुमत मिळालं आहे.

वरूड नगरपालिकेत काँग्रेसचे (Congress) दोन नगरसेवक निवडून आले. तीन जानेवारीला या दोन नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गट नोंदणी केली. यानंतर पाच जानेवारील काँग्रेस नगरसेवकांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांना पत्र देत, आमचा गट रद्द करून, भाजपमध्ये विलीन करावं, असे पत्र दिले. दहा जानेवारीला जिल्हाधिकारी यांनी गट नोंदणीचा आदेश काढला. यात काँग्रेसच्या दोन नगरसेवकांचा गट भाजपमध्ये विलीन झाल्याचे समोर आलं आहे.

Congress join BJP
Gulabrao Patil warning BJP NCP : 'आगे गाडी, पीछे गाडी, बीच में गुलाबराव गडी'; 35 केसेस, शिवसेनेला दादागिरीची भाषा शिकवू नका, शिंदेंच्या मंत्र्यांचा भाजप-राष्ट्रवादीला इशारा

काँग्रेसचा गट थेट भाजपत विलीन झाला आहे. त्यामुळे भाजपात विलीन झालेले काँग्रेस ते दोन नगरसेवक कोण, याची चर्चा राज्यात आहे. मोहम्मद निसार मोहमंद शौकात आणि भाग्यश्री अधव, अशी या काँग्रेसकडून निवडून आलेल्या नगरसेवकांची नावे समोर येत आहेत.

Congress join BJP
BJP Sujay Vikhe : 'माझा पराभव ‘अहमदनगर’ या नावाने झाला, तरी आपण पळ काढणाऱ्यांपैकी नाही'; तयारीत असल्याचा विखेंचा सूचक इशारा

देवेंद्र भुयार यांची टीका

वरूड नगरपालिकेत काँग्रेसने सत्ताधारी भाजपमध्ये गट विलीन करण्यावरून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले, "फुले-शाहू-आंबेडकर यांच्या नावावर मते मागायची, दुसरीकडे कट्टर विचारधारेबरोबर जायचे, त्यांना समर्थन द्यायचे, सत्तेत सहभागी व्हायचे. विकासाच्या नावाखाली काँग्रेसने मते मागितली. त्यांना लोकांनी मते देखील दिली." परंतु असा प्रकार करून, राज्य, जिल्हा आणि स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांच्या मताला लाथेखाली तुटवलं, असंही देवेंद्र भुयार यांनी म्हटले.

काँग्रेसला मनपूर्वक शुभेच्छा...

'भाजप-काँग्रेस एकत्र होण्याने, जनतेला धक्का बसलाच आहे. हा पराक्रम स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी घडवून आणला आहे. या सर्व काँग्रेस नेत्यांना मनपूर्वक शुभेच्छा,' असा उपरोधिक टोला माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com