महापालिकेवर प्रशासक नियुक्त होणार, आठवडाभरात पदाधिकारी होणार माजी...

गेल्या वर्षभरात महापालिकेच्या (Municipal Corporation) वाहनातून फिरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पहिली रात्र मात्र झोपेशिवाय जाणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationSarkarnama

नागपूर ः महानगरपालिकेच्या विद्यमान सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ ४ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे आणि निवडणूक लांबलेली आहे. त्यामुळे महापालिकेवर प्रशासक नियुक्त होणे निश्चित आहे. आता आठवडाभरातच महापौरांसह, (Mayor) सत्तापक्ष नेते, विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती व नगरसेवक यांच्या पदापुढे माजी लागणार आहे.

५ मार्चपासून महापालिकेत आयुक्त (Municipal Commissioner) राधाकृष्णन बी. प्रशासक म्हणून कार्यभार पाहणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्राने स्पष्ट केले. ४ मार्चच्या सायंकाळी किंवा ५ मार्चच्या सकाळी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्तापक्ष नेते, सभापतींना प्रशासनाने दिलेली वाहने परत करावी लागणार आहेत. प्रशासकीय कामांमध्ये यामुळे काहीही बदल होणार नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

गेल्या वर्षभरात महापालिकेच्या (Municipal Corporation) वाहनातून फिरणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पहिली रात्र मात्र झोपेशिवाय जाणार असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. विशेष म्हणजे, येत्या चार मार्चपर्यंतच नागपूरचे (Nagpur) महापौर किंवा नगरसेवक म्हणून मिरवता येणार आहे. पाच मार्चपासून सारेच पदाधिकारी व नगरसेवकांच्या पदापुढे माजी लागणार आहे. त्यामुळे नव्याने उमेदवारीची अपेक्षा असलेल्या एखाद्या नगरसेवकांनी गल्लीत फिरताना विरोधी कार्यकर्ता माजी नगरसेवक आले, असा टोला हाणू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे.

Nagpur Municipal Corporation
महानगरपालिका निवडणूक : मुनगंटीवार नागपूर, तर बावनकुळे चंद्रपूरचे प्रभारी…

यापूर्वीही अनेकदा प्रशासक..

महापालिकेच्या नोंदींनुसार ऑक्टोबर १९६५ ते मार्च १९६९, त्यापुढे मार्च १९८१ ते मे १९८५ या कालावधीत वेगवेगळे अधिकारी प्रशासक होते. यात १२ मार्च ८१ ते १८ मार्च ८१, या सहा दिवसांच्या काळात अशोक देसाई प्रशासक होते, १९ फेब्रुवारी १९८२ ते २८ मार्च १९८२ या सव्वा महिन्यात व्ही. एस. गोपालकृष्ण तर २९ मार्च १९८२ ते ३ जून १९८३ या सव्वा वर्षात शिवरामकृष्ण प्रशासक होते. त्यापुढे ४ जून १९८३ ते १४ मे १९८५ या दोन वर्षांच्या कार्यकाळात बी. एन. मखिजा यांना प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. ३१ डिसेंबर १९८८ रोजी महापालिका बरखास्त करण्यात आली होती. तत्कालीन विभागीय आयुक्त सुंदरम यांना प्रशासक नियुक्त करण्यात आले. त्यानंतर १९८९ पर्यंत एम. बी. चौबे, अजित वर्टी, राजेंद्रसिंह हेही प्रशासक होते. क्रीडा घोटाळ्यात मनपा बरखास्तीनंतर २८ सप्टेंबर २००० ते २५ नोव्हेंबर २०११ पर्यंत टी. चंद्रशेखर प्रशासक होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com