महानगरपालिका निवडणूक : मुनगंटीवार नागपूर, तर बावनकुळे चंद्रपूरचे प्रभारी…

चंद्रपूर (Chandrapur) शहर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात शहरप्रमुख मंगेश गुलवाडे, तर नागपूरमध्ये (Nagpur) शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके (Pravin Datke) यांच्यावरच जबाबदारी असणार आहे.
Chandrashekhar Bawankule and Sudhir Mungantiwar, BJP
Chandrashekhar Bawankule and Sudhir Mungantiwar, BJPSarkarnama

नागपूर ः राज्यात महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रभारी म्हणून काल मुंबई येथे झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जिल्ह्याचे प्रभारी निवडले. यामध्ये माजी ऊर्जामंत्री, भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर चंद्रपूर महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून, तर माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर नागपूर महानगरपालिकेचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी पक्षाने सोपविली आहे.

आमदार मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांच्याकडे बीड आणि जालना जिल्ह्यांच्या प्रभारीपदाचीही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे नेते आता जबाबदारी सोपविलेल्या जिल्ह्याच्या महापालिका (Municipal Corporation) निवडणुकींचे मॉनिटरींग करणार आहेत. निवडणुका (Election) लढवण्याची भाजपची स्वतःची एक पद्धत आहे. त्यानुसारच या जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या आहेत. प्रामुख्याने बूथ पातळीवरची यंत्रणा सक्रिय आहे की नाही, मेळावे, निवडणुकीचे मुद्दे, लहान मोठ्या सभांचे आयोजन, सोशल मिडीयाची आखणी या आणि इतर सर्व कामांवर हे प्रभारी लक्ष ठेवून असणार आहेत. पण मुख्य काम त्या-त्या ठिकाणचे प्रमुखच बघणार आहेत.

चंद्रपूर शहर महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भात शहरप्रमुख मंगेश गुलवाडे, तर नागपूरमध्ये शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांच्यावरच निवडणुकीची संपूर्ण दारोमदार राहणार आहे. तिकीट वाटप, ही महत्वाची जबाबदारी या प्रमुखांवरच असणार आहे. पण जर का तिकिटे वाटताना कुठे वाद झाला, दोन नेते आमने-सामने उभे ठाकले, तर तेव्हा थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून प्रभारी मध्यस्थी करून त्यावर तोडगा काढतील. एकंदरीतच निवडणुकीच्या कामावर लक्ष ठेवण्याचे काम प्रभारींचे असणार आहे. इतर वेळी आमदार मुनगंटीवार चंद्रपूर आणि आमदार बावनकुळे हे आपआपल्या शहरांतच असणार आहेत.

Chandrashekhar Bawankule and Sudhir Mungantiwar, BJP
योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे गोरखपूरमध्ये...

आमदार बावनकुळे हवेच आहेत..

नागपूर महानगरपालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये नाना पटोले भाजपचे निवडणूक प्रभारी होते. त्यानंतर अमरावतीचे डॉ. सुनील देशमुख होते. ते कॉंग्रेसमध्ये गेल्यामुळे आता आमदार सुधीर मुनगंटीवार यांना नागपूरचे प्रभारी करण्यात आले आहे. पण आमदार बावनकुळे नागपूर विधानपरिषेदेचे सदस्य आहेत. आमचे नेते आहेत, तिकीट वाटप आणि इतर प्रक्रियेमध्ये ते नागपूरात असणारच आहेत आणि आम्हाला ते हवेच आहेत, असे भाजपचे शहराध्यक्ष आमदार प्रवीण दटके ‘सरकारनामा’शी बोलताना म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com