Anandrao Adsul: खासदारकी अन् राज्यपालपदासाठी पत्ता कट; अडसूळ आता विधानसभेला ताकद लावणार

Amravati Political News : शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढल्यानंतर आनंदराव अडसूळ यांना 2019 साली आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी धक्कादायक पराभव केला होता. तेव्हापासून अडसूळ आणि राणा यांच्यातून विस्तवही जात नाही.
Anandrao Adsul
Anandrao Adsulsarkarnama
Published on
Updated on

Amravati News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची ओळख आहे. मात्र, या अडसूळांनी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी प्रचंड आदळआपट केली. त्यांच्या नाराजीचे सूर दिल्लीपर्यंत उमटले. अखेर अमित शाहांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी आपली तलवार म्यान केली अन् नाईलाजास्तव भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी माघार घेतली.

काही दिवसांपूर्वीच अनेक ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, यातही अडसूळांचा पत्ता कट करण्यात आला.यावेळी तर त्यांनी थेट अमित शाहांवरच शब्द न पाळल्याचा गंभीर आरोपही केला होता. याच आनंदराव अडसूळांनी (Anandrao Adsul) आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपली ताकद लावणार असल्याचे संकेत दिले आहे.त्यांनी थेट दर्यापूर मतदारसंघावर दावा ठोकतानाच ही जागा महायुतीत जवळजवळ शिवसेनेला सुटल्यासारखीच असल्याचं विधान करत आपले इरादे स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे.महायुती आणि महाविकासत सध्या जरी जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाले नसले तरी विद्यमान आणि माजी आमदारांसह इच्छुकांनी आपआपल्या मतदारसंघासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दर्यापूर विधानसभा जागेवर मोठा दावा केला आहे.

अडसूळ नेमकं काय म्हणाले..?

माजी खासदार आनंदराव अडसूळ म्हणाले, दर्यापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे अभिजित अडसूळ यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल आहे. याआधी दर्यापूरमधून अभिजित हे निवडूनही आले आहेत. त्यामुळे तेच दर्यापूर मतदारसंघातून विधानसभा लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचं वक्तव्य करत शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी हा मतदारसंघ सोडणार नसल्याचा स्पष्ट इशारा महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना दिला आहे.

Anandrao Adsul
RSS-BJP Election Strategy : लोकसभेत भाजपला फटका बसला; विधानसभेला मदतीला ‘संघ’ धावला!

शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढल्यानंतर आनंदराव अडसूळ यांना 2019 साली आनंदराव अडसूळ यांचा नवनीत राणा यांनी धक्कादायक पराभव केला होता. तेव्हापासून अडसूळ आणि राणा यांच्यातून विस्तवही जात नाही.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधीच भाजपचे महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाच्या अडसूळांनी भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) पराभूत होणार असल्याची भविष्यवाणी केली होती, यामुळे अमरावतीचं राजकारण तापलं होतं. पाच वर्षांत काहीच काम केलं नाही त्यामुळे पराभूत होणारच, असे देखील या नेत्याने ठणकावले.

Anandrao Adsul
Congress Politics: भाजपने भ्रष्टाचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनाही सोडले नाही, याची खंत!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com