Anandrao Adsul News : माजी खासदार आनंदराव अडसूळ आता करणार दर्यापूर विधानसभा मतदारसंघावर दावा?

Daryapur Assembly Constituency News : आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसळू हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे आमदार होते.
Anandrao Adsul
Anandrao AdsulSarkarnama
Published on
Updated on

Anandrao Adsul and Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमुळे उमेदवारी नाकारलेल्या नेत्यांची नाराजी दूर करणे महायुतीने सुरू केले आहे. यात शिंदे सेना आघाडीवर आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अमरावतीची हक्काची जागा शिवसेनेने सोडल्याने नाराज झालेले अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना आता राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाचे अध्यक्ष करण्यात आले आहे. हे बघता अडसूळ पुन्हा अमरावतीमध्ये सक्रिय होऊन दर्यापूर विधानसभा मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे.

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने सोमवारी (ता. १६) यासंदर्भात आदेश जारी केला आहे. त्यात अध्यक्षपदी आनंदराव अडसूळ(Anandrao Adsul) यांची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाच्या सदस्यपदी भाजपचे प्रवक्ते तसेच अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे अध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांच्यासह गोरक्षक लोखंडे व वैदेही वाढाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Anandrao Adsul
Raj Thackeray on Ajit Ranade : ''अशा पद्धतीने माणसांना अपमानित करून बाहेर काढणे हेच 'नवं शैक्षणिक धोरण' आहे का ?''

ठाकरे गटात असताना अडसूळ अमरावतीचे खासदार होते. त्यांचे पुत्रसुद्धा अमरावती जिल्ह्यात आमदार होते. मात्र नवनीत राणा(Navneet Rana) यांच्यामुळे अडसूळ यांना पराभूत व्हावे लागले. तेव्हापासून त्यांच्याकडे कुठलीच जबाबदारी नव्हती. ठाकरे गटावर नाराज असलेले अडसूळ हे मुख्यमंत्री शिंदेच्यासोबत बाहेर पडले. मात्र महायुतीमुळेच त्यांना फटका बसल्याचे दिसून आले. भाजपने अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला. महायुतीने नवनीत राणा यांना लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार केले. त्यामुळे आनंदराव अडसूळ प्रचंड चिडले होते.

Anandrao Adsul
Kadambari Jethwani Case : मुंबईतील अभिनेत्रीला 40 दिवस कोठडीत ठेवलं; आंध्र प्रदेश सरकारकडून IPS अधिकाऱ्यांचं निलंबन!

आपण नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले होते. अधून-मधून ते माजी खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकासुद्धा करीत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी महायुतीमुळे लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी देता येऊ शकली नाही. त्यांची नाराजी दूर करणे सुरू केले होते. रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने आणि वाशिमच्या माजी खासदार भावना गवळी यांना विधान परिषदेवर पाठवले.

आनंदराव अडसूळ यांची राज्य अनुसूचित जाती व जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांची समजूत काढण्यात आली आहे. आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसळू हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर मतदारसंघाचे आमदार होते. महायुतीमध्ये अडसूळ पिता-पुत्र पुन्हा आपल्या दर्यापूर मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com