
Nagpur News : राज्यात महिनाभरापासून हिंदी आणि मराठीचा वाद जोरात सुरू आहे. उद्धव सेना आणि मनसेने एकत्रित मोर्चा काढण्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसही त्यात सहभागी होणार होती. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी भाषेचा शासनादेश मागे घेऊन हा वाद शांत केला आहे.
आपणच त्रिभाषा धोरण स्वीकारायचे, आपणच विरोध करायचा, आंदोलन करायचे आणि विजयी सभा घ्यायची या भूमिकेवर एखादा चित्रपट निघू शकतो. तो उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काढावा आणि आपले पाप झाकावे असा टोला खासदार व भाजपचे अनिल बोंडे यांनी लागावला.
मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनीच त्रिभाषा धोरणाला मंजुरी दिली होती. त्यांनीच मराठी माणससाचा घात केला. मुंबई महापालिकेची निवडणूक असल्याने त्यांना आता मराठी माणूस आणि मराठी भाषा आठवली. महाराष्ट्रातील मुलांना समोर जायचे असेल तर एकापेक्षा अधिक भाषा त्यांना आल्या पाहिजे.
मुंबईतील नेते आपल्या मुलांना फ्रेंच शिकतात. तेव्हा मराठीला काहीच धोका नसतो तर आमच्या ग्रामीण भागातील मुलांनी इंग्रजी, हिंदी शिकली तर काय हरकत आहे असा सवालही भाजप नेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचा विरोध आणि मते बघून हिंदी भाषेचा निर्णय रद्द केला आहे. त्याबद्धल उद्धव ठाकरे यांनी त्यांचा सत्कार करावा.
माशेलकर समितीच्या अहवालानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. आता त्यावर नरेंद्र जाधव यांची समिती अभ्यास करून आपला अहवाल सादर करणार आहे. त्यात कुठल्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवली जावी या निर्णय ते देणार आहे.
मात्र, उद्धव ठाकरे आपल्याच दबावामुळे महायुती सरकारने आदेश माघे घेतला असल्याचा दावा करी आहेत. ते विजयी सभा घेणार आहेत. त्यांना स्वतःच्या पक्षाचे अस्तित्व दाखवण्यासाठी सभा घ्यावीच लागणार आहे. स्वतःचे पाप झाकण्यासाठी खटाटोप करावा लागते. यापेक्षा त्यांनी या सर्व घटनाक्रमावर चित्रपट काढावा असा चिमटही खासदार बोंडे यांनी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.