Nagpur Firing : हायकोर्टाचा आरटीओ निरीक्षक गीता शेजवळ यांना ‘अंतरिम’ दिलासा

Geeta Sejwal : मंगळवारी होणार पुढचा फैसला; न्यायालयाच्या निर्णयावर कारवाई अवलंबून
Nagpur High Court.
Nagpur High Court.Sarkarnama
Published on
Updated on

Financial Dispute : आरटीओ पथकाच्या वसुलीवरून झालेल्या वादानंतर परिवहन निरीक्षक गीता शेजवळ यांनी निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर शासकीय बंदुकीतून केलेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेजवळ यांना दिलासा दिला आहे. आता याप्ररकणाची पुढील सुनावणी मंगळवारी (ता. 30) होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत शेजवळ यांच्यावरील अटकेची कारवाई टळली आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील निरीक्षक गीता शेजवळ यांनी निरीक्षक संकेत गायकवाड यांच्यावर नागपूर येथे केलेला गोळीबार हा भरारी पथकांच्या वसुलीचा हिशोब न जुळल्याच्या कारणावरून झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. शेजवळ यांच्या विरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. संकेत गायकवाड यांच्याविरोधातही पुरावे नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Nagpur High Court.
Nagpur Firing : वसुलीच्या कारणावरूनच संकेत गायकवाड यांच्यावर झाडली गोळी

शेजवळ यांना पथक प्रमुख पदावरून हटविल्यानंतर त्यांच्या जागेवर संकेत गायकवाड यांनी नियुक्ती करण्यात आली होती. शेजवळ आणि गायकवाड यांनी केलेल्या वसुलीचा हिशोब जुळत नव्हता. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील एका उच्चस्तरीय अधिकाऱ्यांने त्यांना वसुलीचा हिशोब जुळविण्याची जबाबदारी दिली होती. यातूनच शेजवळ आणि गायकवाड यांच्यात वाद झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुन्हा दाखल झाल्यानंतर शेजवळ यांनी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी नागपूरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने शेजवळ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांचे पथक नगर जिल्ह्यात त्यांचा कसून शोध घेत होते. शेजवळ यांना शोधून काढण्यासाठी पथकांनी नगरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापळा रचला. अशातच शेजवळ यांनी अॅड. अनिल मार्डीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात अंतरिम जामीन मिळविण्यासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला होता. अशात गुरुवारी (ता. 25) याप्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर हायकोर्टाने त्यांना ‘अंतरिम’ मंजूर केला.

Nagpur High Court.
Nagpur Firing : गोळीबार प्रकरणात गडचिरोली डेप्युटी आरटीओंची सहा तास चौकशी

आरटीओमधील हे गोळीबार प्रकरण ‘हायप्रोफाइल’ होत चालले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शेजवळ आणि गायकवाड यांना हिशोब जुळविण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शेजवळ यांच्यापासून सुरू झालेले हे प्रकरण नागपूर आरटीओ कार्यालयातून मंत्रालयाच्या कोणत्या मजल्यापर्यंत जाते हे बघण्यासारखे ठरणार आहे. शेजवळ यांच्या विरोधात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. अद्यापही त्यांना परिवहन विभागाने निलंबित केलेले नाही. शेजवळ धमकी देताना सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेतात असा काँग्रेसचा आरोप आहे. अशात शेजवळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल होऊनही त्यांचे निलंबन होत नसल्याने त्यांना ‘गॉडफादर’ राज्य सरकारमधील कोणीतरी जबरदस्त वजनदार व्यक्त असल्याचे अनेकांचे ठाम मत झाले आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Nagpur High Court.
Took bribes from RTO : गीता शेजवळ अद्यापही फरारच; निवासस्थानांची घेतली झडती !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com