Anil Deshmukh On Ashish Deshmukh : माजी आमदार आशिष देशमुख यांची काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आले आहे. पक्षातील नेत्यांविरोधात वक्तव्य करणं त्यांना चांगलच भोवलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. दरम्यान आता आशिष देशमुख यांची भाजपशी जवळीक वाढत आहे. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली होती. लवकरच ते भाजप प्रवेश करण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)
आता आशिष देशमुख हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. याआधी काही दिवसांपूर्वीच आशिष देशमुख यांची देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नागपूरमध्ये भेट झाली होती. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. आता देशमुख अमित शाह यांची भेट घेणार असल्याने त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, मागील काही काळापासून नागपूरात भाजपची कामगिरी त्यांच्या नेत्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालेली दिसून येत नाही. जिल्हा परिषदेतही भाजपची कामगिरी खालवली होती. आमरावती शिक्षक मतदारसंघाची जागाही भाजपने गमावली होती. काही मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिलेले आहे. अशावेळी आशिष देशमुख यांना भाजपात आणून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात काटोल मतदारसंघातून उतरवण्याची चर्चा आहे.
याबाबत अनिल देशमुख यांना विचारण्यात आले की, भाजपाकडून आशिष देशमुख यांना तुमच्या काटोल मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रश्नावर अनिल देशमुख हे आशिष देशमुख यांची खिल्ली उडवत म्हणाले की, “आशिष देशमुख म्हणज आंतरराष्ट्रीय नेतेच आहेत. त्यांना फर गांभीर्याने घेण्याची गरज नाही,” असं अनिल देशमुखांनी विधान केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.