Maharashtra Politic's : भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार अन्‌ अपराधी आहेत : शिवसेना नेत्याचा हल्लाबोल

भगतसिंह कोश्यारी यांनी घटनाबाह्य पद्धतीने काम करून एक राज्य आणलं.
Bhagat Singh Koshyari-Sanjay Raut
Bhagat Singh Koshyari-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगार, अपराधी आहेत. त्यांनी महाराष्ट्राचा मोठा अपराध केला आहे. तो अपराध किती मोठा आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अशा या महाराष्ट्राच्या गुन्हेगाराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटत असतील, तर ती त्यांची प्रवृत्ती आहे, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि कोश्यारी यांच्या भेटीवर भाष्य केले. (Bhagat Singh Koshyari is a criminal of Maharashtra: Shiv Sena leader criticizes)

खासदार राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी घटनाबाह्य पद्धतीने काम करून एक राज्य आणलं. त्यामुळे आपण बसवलेल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी माजी राज्यपाल कोश्यारी हे गेले असतील. ते दोन घटनाबाह्य व्यक्ती बघून घेतील. आम्ही त्या घटनेकडे फार गांभीर्याने पाहत नाही. पण, हे सर्व महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघतो आहे.

Bhagat Singh Koshyari-Sanjay Raut
Maharashtra Politic's : मलाही एकनाथ शिंदेंकडून ऑफर होती : शिवसेना नेत्याचा गौप्यस्फोट

भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या कृत्याची फळे लवकरच त्यांना मिळतील आणि ती कायदेशीर मार्गाने मिळतील, एवढंच मी सांगतो. भगतसिंह कोश्यारी यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना तोडण्यासाठी घटनेचा गैरवापर केला. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून घालविण्यासाठी त्यांनी घटनेचा गैरवापर केला आहे. अशा राज्यपालांना घटनाबाह्य मुख्यमंत्री वर्षावर बोलावून मिठी मारत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी ते केलंच पाहिजे, असेही राऊत यांनी नमूद केले.

Bhagat Singh Koshyari-Sanjay Raut
'Kerala Story' VS 'Real Kerala Story' ‘केरला स्टोरी’ ला उत्तर देण्यासाठी विजयन सरकारने आणली 'द रियल केरला स्टोरी'

संजय राऊत म्हणाले की, सध्या भगतसिंह कोश्यारी हे सामान्य नागरिक आहेत. पूर्वी मुख्यमंत्री हे कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनावर जायचे. आता ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी ‘वर्षा’वर गेले होते, हा फरक आहे, पदावर असण्याचं आणि नसण्याचा. त्यामुळे कोण कोणाला भेटले, यात आम्हाला इंटरेस्ट नाही.

Bhagat Singh Koshyari-Sanjay Raut
Katraj Dairy News : केशरताई पवार यांचा पुणे जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा : अजित पवारांकडे केला सुपुर्त

कोण मोठा, कोण छोटा त्याबाबत डीएनए टेस्ट करावी लागेल

महाविकास आघाडीत राष्ट्रवादीच मोठा भाऊ आहे, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ठीक आहे. सगळ्यांचा डीएनए चेक करू आम्ही एकदा. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय शिवसेना-भाजप युतीमध्ये मागे एकदा आला होता. त्यावेळी मी डीएनए टेस्ट करावी लागेल, असं म्हणाला होतो. पण, महाविकास आघाडीत असे कोणतेही मतभेद नाहीत.

Bhagat Singh Koshyari-Sanjay Raut
Indapur Bazar Samiti : इंदापूर बाजार समितीच्या सभापतीपदी विलास माने यांची बिनविरोध निवड

अजित पवार किंवा मी काय बोलतो यापेक्षा प्रत्येकजण आपापल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपापल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी अशा भूमिका घ्याव्या लागतात. लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. विधानसभेला अजून वेळ आहे. आधी लोकसभा होऊ द्या. आमच्यातील प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू आहेत. त्यात काय चर्चा होते, हे आम्ही कधीच बाहेर सांगणार नाही, असेही संजय राऊत यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com