APMC Patur : ‘सहकार’ने बांधली दिग्गज पक्षांसोबत मोट, ‘परिवर्तन’ असणार मतदारांसाठी नवा पर्याय !

NCP : कृष्णा अंधारे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात उडी घेतली आहे.
Patul APMC
Patul APMCSarkarnama
Published on
Updated on

Akola District's Patur APMC Election : अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचाराचा नारळ पातुरचे आराध्य दैवत श्री संत सिदाजी महाराज यांच्या चरणी फोडून नेत्यांनी प्रचार कार्याला सुरुवात केली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने बाजार समितीत आपले वर्चस्व कायम करणाऱ्या सहकार पॅनलने यावेळी वंचित बहुजन आघाडी भाजप व व शिवसेनेसारख्या दिग्गज पक्षांसोबत मोट बांधली आहे. (The Sahakar panel accommodated all the parties

सहकार पॅनलने सर्वच पक्ष आपल्यात सामावून घेतल्यामुळे अडते व्यापारी मतदार संघासहित एकूण १७ जागांसाठी निवडणूक लढणार आहेत. सर्वपक्षीय बळ एकत्र आल्यामुळे आपला विजय निश्चितच असल्याचा विश्वास सहकार पॅनलला आहे. तर सहकार पॅनलला आव्हान देण्यासाठी व सत्तेत परिवर्तन आणून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यकर्ते कृष्णा अंधारे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या राजकारणात उडी घेतली आहे.

कृष्णा अंधारे यांनी शेतकरी परिवर्तन पॅनल उभे केल्यामुळे मतदारांना एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे यावेळी शेतकरी परिवर्तन पॅनल कडून ग्रामपंचायत मतदार संघातून चार व सोसायटी मतदारसंघातून ११ असे एकूण १५ उमेदवार शेतकरी पॅनलकडून निवडणूक लढणार आहेत.

एकास एक अशी लढत असल्यामुळे प्रचारात रंगत येणार आहे. या निवडणुकीमध्ये मतदार नव्याने स्थापन झालेल्या शेतकरी परिवर्तन पॅनलला पसंत करतील की कित्येक वर्षांपासून सत्तेत कायम असणाऱ्या सहकार पॅनललाच पसंती देतील, हे निकालाअंतीच कळणार आहे.

Patul APMC
Warora APMC News : स्वगृही-वरोरा बाजार समितीत धानोरकरांच्या विरोधात उभा ठाकला कॉंग्रेसचाच एक गट !

वंचित बहुजन आघाडी, (Vanchit Bahujan Aghadi) शिवसेना (Shivsena)भारतीय जनता पक्ष (BJP) या सर्वांना सोबत घेऊन नेहमीसारखी निवडणूक (APMC Election) लढवून प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्याचा प्रयत्न सहकार पॅनलच्या माध्यमातून करणार असल्याचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक जगदीश पाचपोर यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com