Gondia Zilla Parishad : बांधकाम, आरोग्य विभागाला राजशिष्टाचाराचा विसर

Inauguration Ceremony : उपमंत्र्यांचा दर्जा प्राप्त अध्यक्षालाच केले अतिथी
Gondia Zilla Parishad.
Gondia Zilla Parishad.Sarkarnama
Published on
Updated on

Arjuni Morgaon Panchayat Samiti : गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत येत असलेल्या अर्जुनी मोरगाव पंचायत समितीच्या नवनिर्मित इमारतीचा लोकार्पण सोहळा व जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा लोकार्पण सोहळा बांधकाम व आरोग्य विभागाच्यावतीने आयोजिण्यात आला होता. या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिका तयार करताना दोन्ही विभागांना राजशिष्टाचाराला विसर पडल्याचे दिसत आहे.

राजशिष्टाचाराप्रमाणे पालकमंत्री उद्घाटक असतील तर उपमंत्र्याचा दर्जा प्राप्त असलेले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असायला पाहिजेत. मात्र दोन्ही कार्यक्रमाच्या लोकार्पण पत्रिकेत पालकमंत्री उद्घाटक असताना कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व राज्यसभा खासदार व लोकसभा खासदारांचे नाव घेण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षांना मात्र मुख्य अतिथी ठेवण्यात आले. या निमंत्रणपत्रिकेमुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Gondia Zilla Parishad.
Recruitment News in Gondia : भाऊ नोकरी पाहिजे? अडीच लाखांचा रेट सुरू आहे !! भरतीपूर्वी उमेदवारांना आमिष

खासदार व आमदारापेक्षाही जिल्हा परिषद अध्यक्षांचे स्थान हे महत्त्वाचे मानले जाते. असे असताना त्याकडे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही ही बाब लक्षात आली नाही. पत्रिकेत राजशिष्टाचाराला मान न देता नियोजन करण्यात आल्याने गोंदिया जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहागंडाले यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला.

कार्यक्रमाला जाण्याऐवजी रहांगडाले यांनी आपल्या कार्यालयात उपस्थित राहत जनसामान्यांच्या कामांना प्राधान्य देणे पसंत केले. विशेष म्हणजे पंचायत समिती अर्जुनी मोरगावच्या इमारत बांधकामाच्या इलेक्ट्रिक व इतर साहित्यासाठी जिल्हा निधीतून विशेष निधी मंजूर करून इमारत पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षांनी पुढाकार घेतल्यानंतरही बांधकाम विभागाने त्यांना डावलले. ही चूक झाली की हे कृत्य जाणिवपूर्वक करण्यात आले, यावर चर्चा सुरू झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अर्जुनी मोरगाव पंचायत समिती कार्यालयासाठी 3 कोटी 70 लाखांच्या निधीतून भव्य प्रशासकीय इमारत निर्माण करण्यात आली. प्रजासत्ताकदिनानिमित्त राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदियाचे पालकमंत्री धर्मरावबाबा अत्राम दोन दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अर्जुनी मोरगाव येथील पंचायत समितीच्या नवनिर्मित प्रशासकीय इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते सहभागी झाले.

व्यासपीठावर अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सविता कोडापे होत्या. अतिथी म्हणून आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील, उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, अभियंता अतुल मेश्राम, गटशिक्षणाधिकारी ऋषी मांढरे, महिला व बालकल्याण अधिकारी प्रियंका किरणापुरे, उपसभापती होमराज पुस्तोडे आदी उपस्थित होते.

Gondia Zilla Parishad.
Gondia Crime : लाखोंचे सोने, हिरे पाहून कारागिराची नियत फिरली की....

जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले. लोकार्पण सोहळा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसचा होता, असा समज आता भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. या कार्यक्रमामुळे भाजपात नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Gondia Zilla Parishad.
Gondia : सरकारला लाचखोरांचा पुळका; गोंदियात 31 कर्मचारी सेवेत पुनर्स्थापित

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com