Recruitment News in Gondia : भाऊ नोकरी पाहिजे? अडीच लाखांचा रेट सुरू आहे !! भरतीपूर्वी उमेदवारांना आमिष

Zilla Parishad : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे करण्यात आली तक्रार
Gondia Zilla Parishad.
Gondia Zilla Parishad.Sarkarnama
Published on
Updated on

: गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या कार्यकक्षेतील जलजीवन मिशन सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एका खासगी संस्थेच्या माध्यमातून गोंदियातील आठही तालुक्यांत अभियंता तसेच डाटा एन्ट्री ऑपरेटरची पदे भरण्यात येणार आहेत. या पदांवर नियुक्तीसाठी दलालांनी जाळे विणले आहे.

नोकरभरतीसाठी शासनामार्फत या संस्थेची निवड झाली असली तरी भरतीचा मुहूर्त अद्याप सापडलेला नाही. अशात संस्थेच्या माध्यमातून उमेदवारांची चाचपणी करून निवडीसाठी 2 ते 3 लाख रुपयांची ऑफर दिली जात आहे. याबाबतची तक्रार शिवसेनेचे गोरेगाव तालुका संघटकप्रमुख दुर्गेश बिसेन यांनी गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. Recruitment News in Gondia

Gondia Zilla Parishad.
Gondia Crime : लाखोंचे सोने, हिरे पाहून कारागिराची नियत फिरली की....

तक्रारीमुळे आता यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती ठोस कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वच्छ भारत मिशन ग्रामीणअंतर्गत राज्य शासनाच्यावतीने गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. गावातही सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचा तिढा मार्गी लागावा, यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्याअनुषंगाने शासनाने जलजीवन मिशन ग्रामीण, तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेची निवड केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या यंत्रणेच्या माध्यमातून गोंदिया जिल्ह्याकरिता सिनगेस सोल्युशन कंपनीची निवड करण्यात आली आहे. संस्थेची निवड करण्यात आली असली तरी अद्याप भरतीचे निर्देश देण्यात आलेले नाही. जिल्ह्यातील आठही तालुके मिळून अभियंता तसेच डाटा ऑपरेटर यांची एकूण 27 पदे भरायची आहेत. या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जलजीवन मिशन, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या पदांवर नियुक्तीसाठी घोडेबाजार सुरू झाला आहे. दोन ते तीन लाख रुपये भरून ही पदभरती घेतली जात असेल तर याद्वारे नियुक्त झालेले कर्मचारी कितपत प्रामाणिकपणे काम करतील अशी शंका उपस्थित होत आहे. त्यामुळे पदभरती होण्यापूर्वीच ही प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भरतीचे आदेश देण्यापूर्वीच संबंधित संस्थेच्या काही व्यक्तींनी संभावित उमेदवारांची चाचपणी करून निवडीसाठी लाखो रुपयांची ‘ऑफर’ दिली आहे. त्यामुळे या भरती पूर्वीच हा प्रकार समोर आल्याने गोरेगाव येथील शिवसेनेचे तालुका संघटकप्रमुख दुर्गेश बिसेन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवदेन देऊन हा प्रकार समोर आला आहे. आता निवड करणाऱ्या या संस्थेवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Gondia Zilla Parishad.
Gondia Political : आमगाव, तिरोडा तालुक्याला उदासीनतेचे ग्रहण..! ग्रामस्वच्छता अभियानाची तपासणी रखडली...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com