Arni APMC Election : आघाडीसमोर भाजप-शिंदे गटासह 'या' माजी मंत्र्यांनी उभे केले तगडे आव्हान !

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीतून दूर सारले आणि आणी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती केली.
Arni APMC Sanjay Deshmukh
Arni APMC Sanjay DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District Arn APMC Election : पूर्वी आर्णी-दिग्रस मतदारसंघ असताना या विधानसभा क्षेत्राचे आमदार राहिलेले माजी मंत्री संजय देशमुख यांची आर्णी तालुक्यातील सहकार क्षेत्रावर मजबूत पकड होती. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगूल वाजताच काँग्रेस पक्षाने शिवसेनेला (उद्धव ठाकरे) महाविकास आघाडीतून दूर सारले आणि आणी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती केली. (Sanjay Deshmukh had a strong hold on the cooperative sector in Arni taluka)

महाविकास आघाडीसमोर आधीच भाजप-एकनाथ शिंदे गटाचे मोठे आव्हान आहे. त्यातच नाराजांना सोबत घेऊन संजय देशमुख यांनी आघाडीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. देशमुखांनी आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. आर्णी बाजार समितीत एकेकाळी देशमुखांचे चांगले संख्याबळ होते.

Arni APMC Sanjay Deshmukh
Arni APMC Election : आर्णी बाजार समिती निवडणुकीत आमने-सामने उभे ठाकले सख्खे काका-पुतणे...

राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेसने काही जणांना पुन्हा उमेदवारी दिल्याने आर्णी तालुक्यातील मतदारांसह काही कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर उमटला. नेमकी हीच बाब हेरुन शिवसेनेत (उद्धव ठाकरे) प्रवेश केलेले माजी मंत्री संजय देशमुख यांनी आर्णी तालुक्यात संपर्क वाढविला आणि बाजार समिती निवडणुकीसाठी कंबर कसली.

उद्धव ठाकरे गटात प्रवेश केल्यापासून संजय देशमुख यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे व शिवसैनिकांना सोबत घेऊन आर्णी बाजार समितीवर शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी राजकीय खेळी केली आहे. आर्णी बाजार समिती निवडणुकीत जागा वाटपावरून महाविकास आघाडीची बिघाडी झाल्याने उद्धव ठाकरे शिवसेना ही राष्ट्रवादीसह काँग्रेस पक्षातील नाराजांना उमेदवारी देऊन बाजार समितीच्या निवडणुकीच्या (APMC Election) रिंगणात उतरविले आहे.

Arni APMC Sanjay Deshmukh
APMC Balapur : २० वर्षांची सत्ता उलथून लावण्यासाठी वंचित-भाजप उतरले मैदानात?

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे संजय देशमुख ताकदीनिशी उतरल्याने काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादीला या निवडणुकीत कडवी झुंज द्यावी लागणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने (NCP) पुन्हा तेच ते उमेदवार दिल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीसमोर संजय देशमुख यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीबद्दल बऱ्याच कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर असल्याने त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न संजय देशमुख करत आहेत. या प्रयत्नात ते कितपत यशस्वी होतील, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com