Akola AMC : लवकरच उभी होणार अकोला महापालिकेची नवी इमारत

Government Decision : जागेचा ताबा अखेर महापालिका प्रशासनाला
Akola AMC
Akola AMCSarkarnama
Published on
Updated on

Akola AMC : अकोला महापालिकेला सध्या असलेल्या जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत जाण्याचा योग नवीन वर्षात जुळून आला आहे. महापालिकेची सध्याच्या परिस्थितीत अत्यंत तोकडी पडत आहे. त्यामुळे अकोला महापालिकेची नवीन इमारत लवकरच होणार आहे. नव्या इमारतीसाठी लागणाऱ्या जागेचा अखेर ताबा महापालिका प्रशासनाला मिळाला आहे. लवकरच या जागेवर बांधकाम सुरू होणार आहे. विशेष म्हणजे अकोला शहराच्या मध्यभागी ही इमारत होणार असल्याने नागरिकांना सोयीची होणार आहे.

गेल्या 23 वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2001 मध्ये अकोला नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले. तेव्हापासून तर आतापर्यंत जुन्याच इमारतीत महापालिका प्रशासनाचे कामकाज होत आहे. शहराच्या अतिशय गजबजलेल्या ठिकाणी महापालिकेची जुनी इमारत आहे. तोकड्या जागेत महापालिका उभी आहे. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना नागरिकांसह प्रशासनाला करावा लागत आहे. अकोला शहराची झालेली वाढ आणि त्यामुळे महापालिकेचा वाढलेला कामाचा व्याप आणि महापालिकेतील विविध विभाग लक्षात घेता या सर्व प्रकारामुळे महापालिका कार्यालयात कामकाज करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Akola AMC
Akola Zilla Parishad : बुलढाण्यानंतर अकोला सीईओ उगारणार का शिस्तीची छडी?

काही वर्षांपूर्वी अकोला महापालिकेला नवीन प्रशासकीय इमारत बांधण्याची जागा मिळण्यापूर्वीच शासनाने इमारतीच्या बांधकामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला होता. तत्कालीन महापौर उज्ज्वला देशमुख यांनी प्रशासकीय इमारतीच्या जागेची पाहणी केली होती. अकोला शहरातील मध्यवर्ती भागातील रतनलाल प्लॉट चौक ते टॉवर चौक यादरम्यान असलेल्या जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेच्या जागेची निवड करण्यात आली होती. मात्र, ही जागा जिल्हा परिषदेच्या ताब्यात होती. त्यामुळे या जागेचे हस्तांतर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. ही जागा डिसेंबर 2017 रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाकडे जमा करण्यात आली होती. मात्र, तेव्हापासून म्हणजेच गेल्या सहा वर्षांपासून या जागेबाबत वादविवाद सुरू होते. त्यामुळे महापालिकेला ही जागा मिळाली नव्हती. त्यामध्ये मोठ्या अडचणी येत होत्या. निधी मिळूनही महापालिकेच्या नव्या इमारतीचे बांधकाम कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. 2017 पासून आजपर्यंत जागेअभावी नवी इमारत कशी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता.

अखेर 12 फेब्रुवारी रोजी शासनाने नझुल शिट क्रमांक 52 नझुल भूखंड क्रमांक 11-1 मधील 25 हजार 567 चौरस मीटर जागेपैकी महापालिकेला शासनाने 14 हजार 732 चौरस मीटर जागा महापालिका प्रशासनाच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. यावरूनच महापालिका प्रशासनाने जागा ताब्यात देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र दिले होते. त्यानंतर शुक्रवारी (ता. 16) जिल्हाधिकारी कार्यालयातून महापालिकेला ताबा आदेश देण्यात आला. त्यामुळे महापालिकेची नवी इमारत होण्याचा प्रश्न निकाली लागला आहे.

Akola AMC
Akola Political News : देशाचं भविष्य असलेल्या तरुणाईने असा केला 'व्हॅलेंटाइन डे' साजरा !

महापालिकेची जुनी इमारत अतिशय तोकडी आणि शहरातील अतिशय गजबजलेल्या परिसरात असल्याने नागरिकांसह प्रशासनाला अडचण जात होती. अतिशय लहान जागेत महापालिकेचे सर्वच विभागाचे कामकाज चालत होते. जुन्या इमारतीत पार्किंगची अडचण, तोकड्या जागेत वेगवेगळे विभाग त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होत होता. आता शहराच्या मध्यवर्ती भागात नव्या इमारतीचा मार्ग मोकळा झाला असून, याचा फायदा शहरातील कोणत्याही भागात राहणाऱ्या नागरिकांना सोयीचे होणार आहे. मात्र, आता लवकर इमारतीचे बांधकाम सुरू व्हावे ही मागणी होणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

R

Akola AMC
Akola Shiv Sena : रस्त्याच्या मागणीसाठी बांधकाम कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com