Ashish Deshmukh News : मल्लिकार्जुन खर्गे यांनी शरद पवारांचा आदर्श घेऊन राजीनामा द्यावा !

Rahul Gandhi : कॉंग्रेस पक्षाचे सर्वच निर्णय राहुल गांधी घेतात.
Sharad Pawar, Ashish Deshmukh and Mallikarjun Kharge.
Sharad Pawar, Ashish Deshmukh and Mallikarjun Kharge.Sarkarnama

Dr. Ashish Deshmukh on Mallikarjun Kharge : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वासंदर्भात आणि कॉंग्रेस पक्ष नेतृत्वासंदर्भात वेगळीच चर्चा रंगली आहे. काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी असा दावा केला की, कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे असले तरी महत्वाचे निर्णय राहुल गांधीच घेतात. या त्यांच्या दाव्यावर कॉंग्रेस नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी प्रतिक्रिया दिला आहे. (A different discussion has taken place regarding the Congress party leadership)

आज (ता. ५ मे) डॉ. देशमुख म्हणाले, नाना पटोले यांनी संजय राऊत यांना त्यांच्याच शब्दांत उत्तर दिले. ते म्हणाले, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, कॉंग्रेस पक्षाचे सर्वच निर्णय राहुल गांधी घेतात. २८ ऑक्टोबर २०२२ ला मल्लिकार्जुन खर्गे कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आरूढ झाले. त्यावेळी आम्ही डॉ. शशी थरूर यांच्या सोबत होतो. या एप्रिल महिन्याच्या अखेरीस त्यांना येऊन सहा महिने उलटून गेले. पण अजूनपर्यंत त्यांना AICC मधले जनरल सेक्रेटरी किंवा इतर पदाधिकारी यांची पदे भरता आली नाहीत.

CWCसाठी रायपूर येथील प्लेनरी सेशन होऊनसुद्धा अडीच महिने झाले. राहुल गांधी ही निवड होऊ देत नाहीत का, हा प्रश्न आहे. शरद पवार यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रशंसनीय आणि इतरांना प्रेरित करणारा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसमध्येही ही स्थिती आजचीच नाही आहे, तर ती गेल्या अनेक वर्षापासूनची आहे. २०१९ मध्ये राहुल गांधी यांनी कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधींनी पक्षाचे अध्यक्षपद सांभाळले होते.

त्या कालावधीतही एकही दिवस AICCच्या कार्यालयात न येता राहुल गांधी हेच कॉंग्रेसचे देशपातळीवर सर्व निर्णय घेत होते, हे कोणताही जबाबदार व्यक्ती सांगेल. शरद पवार यांनी एक चांगलं पाऊल उचलले आहे. सातत्याने अपमान होत असेल तर त्याच पद्धतीने खर्गेंनी या वयात पदमुक्त व्हावं. जेणेकरून एखाद्या तरुण व्यक्तीला कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी आरूढ होण्याची संधी मिळेल. डॉ. शशी थरूर यांच्यासारख्या चांगल्या व्यक्तीच्या पाठीशी आमच्यासारखे तरुण लोक उभे झाले होते. त्यांना संधी मिळाली असती तर कॉंग्रेसला नक्कीच चांगले दिवस बघता आले असते, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

Sharad Pawar, Ashish Deshmukh and Mallikarjun Kharge.
Gadchiroli District APMC Analysis : अहेरी, सिरोंचात दोन राजे एकत्र येऊनही आदिवासी विद्यार्थी संघटनेचाच जलवा !

खर्गे राहुल गांधी यांच्या आदेशानेच काम करत आहेत. शरद पवार यांचा आदर्श ठेऊन पवार साहेबांच्या वयोगटाच्या मल्लिकार्जुन खर्गे यांनी सन्मानाने पायउतार व्हावे. खर्गे साहेबांना स्वतंत्रपणे निर्णय घेऊ देता येत असतील तर त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला पक्षासाठी काही चांगले करता येईल आणि त्यामुळे पक्षाला चांगले दिवस येऊ शकतील. परंतु, सहा महिन्यानंतरसुद्धा जनरल सेक्रेटरी, AICCपदाधिकारी, CWC सारखी एकसुद्धा नवीन नियुक्ती खर्गे साहेब करू शकत नसतील तर यामागे कोण कारणीभूत आहे, हे लोकांना सांगण्याची गरज नाही.

सर्व सूत्र राहुल गांधी हलवतात, ही कॉंग्रेसची परिस्थिती आहे. अतिशय चांगली दूरदृष्टी ठेवणारे शरद पवार साहेब एक आदर्श नेते आहेत. राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या या वयात त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षांना जो आदर्श दिला आहे, त्या आदर्शावर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने देखील चालावं आणि नवीन पिढीला, तरुणांना कॉंग्रेसमध्ये पुढे येण्याची संधी दिली द्यावी, अशी मागणी आशिष देशमुख यांनी केली.

Sharad Pawar, Ashish Deshmukh and Mallikarjun Kharge.
Washim District APMC Analysis : भाजपने देशमुखांमुळे राखले रिसोड, बाकी सर्वत्र कॉंग्रेस-राष्ट्रवादीच !

‘ते’ पटोलेंनी सोडलेले पिल्लू..

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवीन पिल्लू सोडलं होतं की, .. राहुल गांधी यांची सभा नागपूरमध्ये वज्रमूठ सभेच्या काळात होणार. त्यानंतर एक महिना लोटूनसुद्धा राहुल गांधी नागपूरला आले नाहीत. मी त्याच वेळेस म्हटले होते की, कुठे ना कुठे ही महाविकास आघाडीची वज्रमूठ तुटावी, हेच नाना पटोलेंचे धोरण आहे. कालचे नाना पटोले यांनी खालच्या पातळीवर जे शब्द वापरले, हे त्या पदाला शोभणारे नाही.

संजय राऊत (Sanjay Raut) हे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र राहावी, यासाठी प्रयत्नशील असताना महाराष्ट्राचे (Maharashtra) आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) या आघाडीत फूट पडावी म्हणून प्रयत्नरत आहेत. काल त्यांनी संजय राऊत यांच्या संदर्भात जे वक्तव्य केले, ते महाविकास आघाडी फुटावी, यादृष्टीने उचललेले पुढचे पाऊल आहे. पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडी राज्यात अस्तित्वात राहणार नाही, अशी भीती डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com