

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर परिषदेत सर्वच पक्षांच्या उमेदवारी दावेदारी दाखल केली आहे. बंडखोरांची संख्याही मोठी आहे. भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बंडखोरांची समजूत काढली जाईल आणि बंडखोरी कमी झाल्याचे दिसेल, असा दावा केला होता. मात्र, तो फोल ठरला असल्याचे दिसून येते. दुसरीकडे अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मोठी जादू केली. कन्हान नगरपरिषदेतील काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारालाच आपल्या गळाला लावले. त्याने निवडणुकीतून माघार घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला असून शिंदे सेनेच्या विजयाचा मार्ग सोपा झाला आहे. आता येथे काँग्रेसचा उमेदवारच नगराध्यक्षपदासाठी शिल्लक राहिलेला नाही.
विशेष म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या कन्हान या मूळ गावात ही राजकीय घडामोड घडली आहे. राजेश यादव कन्हान नगर परिषदेतून दोन वेळा निवडून आले होते. त्यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य व सरपंच होते. कन्हान नगर परिषदेचे उपाध्यक्ष होते. नगर काँग्रेस (Congress) कमिटीचे अध्यक्ष होते. त्यांना काँग्रेसने नगराध्यक्षपदाचे उमेदवार केले होते. त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि थेट शिंदे सेनेत प्रवेश केला आहे.
राजू पारवे, सुधीर पारवे या दोन माजी आमदारांच्या आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद राऊत यांच्या उमेदवार नगर पालिकेत मोठी बंडखोरी झाली आहे. नाराज झालेल्या सर्व इच्छुकांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली आहे. यापैकी कोणीच माघार घेतली नाही. भाजपच्या काही निष्ठावंतांनी बाहेरच्या मंडळींना तिकीट दिला आम्हाला डावलले असे सांगून नेत्यांनी तिकिटे विकल्याचा आरोप केला होता.
राजू पारवे आणि भाजपचे (BJP) जिल्हाध्यक्ष यांच्यावर सर्वांचा येथे रोष आहे. या दोघांच्या राजकारणामुळे माजी आमदार सुधीर पारवे व त्यांच्या समर्थकांनी यांनी या निवडणुकीतून आपले अंग काढून घेतले असल्याचे दिसते. येथे धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. महायुती भांडणे सुरू असताना उद्धव ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष राजेंद्र मेश्राम यांनी निवडणुकीतून माघार घेऊन सर्वांनाच धक्का दिला आहे.
नागपूर जिल्ह्यात 15 नगरपालिका आणि 12 नगर परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. युती तुटली असून आघाडीसुद्धा फुटली आहे. सर्वच पक्ष आपआपल्या बळावर लढत आहेत. दोन सेना आणि दोन राष्ट्रवादीने भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांनाही मोठा फटका बसणार असल्याचे दिसून येते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.