Nagpur Politics : सापडलेल्या रेशन किट कोणाच्या? निवडणूक आयोगही संभ्रमात

Election Commission investigates mystery of discovered ration kits: नागपूर विधानसभा निवडणुकीत सापडलेल्या रेशन किट कोणाच्या आहेत हे निवडणूक आयोगाला सिद्ध करता आलेले नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.
Nagpur Politics
Nagpur PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात सध्या घमासान सुरू आहे. काँग्रेसचे विकास ठाकरे आणि भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यातील थेट लढतीला काँग्रेसचे निलंबित पदाधिकारी नरेंद्र जिचकार यांनी तिरंगी केले आहे. यातून आता पंगे होणे सुरू झाले आहे. जिचकारांचे साहित्य असलेल्या रेशन किट सापडल्या आहेत. त्या जप्तसुद्धा करण्यात आल्या आहेत. मात्र निवडणूक आयोगाला त्या कोणाच्या हे सिद्ध करता आले नाही.

विशेष म्हणजे पश्चिम नागपूरच्या उमेदवाराच्या कीट उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात सापडल्याने हा राजकीय डावपेचाचा भाग असल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे. पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे (Congress) उमेदवार विकास ठाकरे यांनी नरेंद्र जिचकार यांच्या समर्थकांमध्ये मोठा पंगा झाला होता. कार्यकर्त्यांनी एकमेकांचे कपडे फाडले होते. त्यानंतर जिचकारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती आणि निलंबित करण्यात आले.

Nagpur Politics
Ajit Pawar: अजितदादा रवी राणांवर भडकले; म्हणाले, 'वाचळपणामुळे त्यांच्या पत्नीचा पराभव, देवेंद्रजी आता त्यांना...'

पक्षाने एकतर्फी निर्णय घेतल्याने जिचकार चांगलेच दुखावले होते. त्यांनी त्याचवेळी पश्चिम नागपूरमधून निवडणूक लढण्याचा निर्धार केला. वर्षभरापासून ते निवडणुकीची (Election) तयारी करीत आहेत. याचा थेट फटका आमदार विकास ठाकरे यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिचकार यांच्याकडून रेशनच्या कीट वाटल्या जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निवडणूक आयोगाने अद्याप कोणालाही कारणे दाखवा नोटीस बजावलेली नाही.

Nagpur Politics
Parinay Phuke: पटोले पराभूत होणार, भाजपच्या 'या' नेत्याने सांगितला आकडा

जिचकार यांना विचारणा केली असता ते म्हणाले, हा बनावट डाव असल्याचे दिसते. तो कोणाचा डाव असू शकतो हे सांगण्याची गरज नाही. असले फालतू प्रकार करण्याची मला गरज नाही. माझा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बैठका घेऊन, पॉम्पलेट वाटत आहे. कुणी तरी जाणीवपूर्वक या रेशन किटवर माझे प्रचार साहित्य ठेवून व्हीडीओ तयार केले असल्याचे दिसते. माझ्या विरोधकांना पराभवाची चाहूल लागली असल्याने मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असावा अशी शंका जिचकार यांनी व्यक्त केली.

जिचकरांनी प्रकार फेटळला

विधानसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेत मतदारांना भुलविण्यासाठी कुठल्याही वस्तू, पैशांचे वाटप करता येत नाही, तसेच कोणत्याही प्रकारचे अमिष देता येत नाही, असा नियम आहे. मात्र, मतदारांना आकर्षित करण्यासाठी रेशन किट तयार करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई करत मोतीबाग सेंट्रल रेल्वे कॉलनीतील एका क्वॉर्टरच्या मोकळ्या भागातून 220 किट बॅग्ज जप्त केल्या आहेत. या बॅग्जमध्ये नागपूर पश्चिमचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जिचकार यांचे प्रचारपत्रक आढळले आहे. मात्र जिचकरांनी आपली बदनामी करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com