Nagpur News : गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल व त्यांच्या समर्थकांचे निलंबन तब्बल पाच वर्षानंतर भाजपने रद्द केले आहे. या माध्यमातून भाजपने विनोद अग्रवाल हेच संभाव्य उमेदवार असल्याचे संकेत दिले आहे. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी आमदार महिनाभरापूर्वीच आपल्या मूळ पक्षात परतले आहे. हे बघता गोंदयात पुन्हा अग्रवाल विरुद्ध अग्रवाल असा सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
2019च्या निवडणुकीची हवा बघून अनेक नेत्यांनी भाजपात उड्या मारल्या होत्या. त्यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाली होती. गोंदिया जिल्ह्यात विनोद अग्रवाल (Vinod Agrawal) भाजपचे कार्यकर्ते होते. त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानल्या जात होती. कार्यकर्ते कामाला लागले होते. ऐन निवडणुकीची धामधूम सुरू असताना काँग्रेसचे तत्कालीन आमदार गोपाल अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला. त्यांना लगेच उमेदवारीसुद्धा जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विनोद अग्रवाल चांगलेच दुखावले होते. गोपाल अग्रवाल आणि उपऱ्यांना संधी देणाऱ्या भाजपच्या नेत्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी निवडणूक लढण्याचा निर्धार केला.
भाजपमधील (BJP) अनेक कार्यकर्ते व समर्थकही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे विनोद अग्रवाल यांनी निवडणुकीतून माघार घेण्यास नकार दिला. गोंदियाचे तीन वेळा आमदार असलेल्या गोपाल अग्रवाल यांना पराभवाचा धक्का दिला. गोपाल अग्रवाल यांनी अचानक पक्ष सोडल्याने काँग्रेसचीसुद्धा अडचण झाली होती. काँग्रेसचे पदाधिकारी अमर वऱ्हाडे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी त्यांची काहीच तयारी नव्हती. गोंदियाच्या मतदारांनी दगाबाजी केल्याने गोपाल अग्रवाल यांना पराभूत करून चांगलाच धडा शिकवला.
भाजपने आपली चूक सुधारली. आमदार विनोद अग्रवाल व त्यांच्या समर्थकांचे निलंबन मागे घेतले. या मागे गोंदिया येथे काँग्रेस विरुद्ध लढण्यासाठी भाजपकडेसुद्धा दमदार उमेदवार नसल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसमधून आलेले एकएक नेते भाजप सोडून आपल्या मूळ पक्षात परत जात आहे. भाजपसाठी ही चिंतेची बाब असली तरी कार्यकर्त्यांमध्ये आनंद आहे. आता भाजपला निष्ठावना कार्यकर्त्यांची किंमत कळली असेल अशा प्रतिक्रिया गोंदियातील भाजप कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.