Assembly Election Results : काँग्रेसमधून आलेल्या पारवेंमुळे भाजपचे पारवे पडले! कार्यकर्त्यांकडून आरोपांच्या फैरी

Umred Constituency BJP Raju Parve Sudhir Parve : राजू पारवे यांच्या भाजप प्रवेशाला भाजप परिवारातील सर्वांचाच विरोध होता. विधानसभा निवडणूक काळात त्यांना प्रवेश देऊ नका, त्याचा फटका बसेल, याकडेही नेत्यांचे लक्ष वेधण्यात आले होते.
Sudhir Parve, Devendra Fadnavis, Raju Parve
Sudhir Parve, Devendra Fadnavis, Raju ParveSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपचा धक्कादायक पराभव झाला आहे. याची कारणे आता शोधल्या जात आहे. माजी आमदार पारवे बंधू एकत्र आल्यास भाजपचा विजय सोपा होईल, असे दावे केले जात होते. मात्र उलट झाले. काँग्रेसमधून पक्षात आयात केलेल्या माजी आमदार राजू पारवे यांच्यामुळेच पक्षाचे उमेदवार सुधीर पारवे यांचा पराभव झाल्याचा भाजपच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

सुधीर पारवे उमरेड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा निवडून आले होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राजू पारवे यांनी त्यांना पराभूत केले होते. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे ते महायुतीचे उमेदवार होते. तेथे ते पराभूत झाले. या कोलांटउड्यांमुळे काँग्रेस आणि भाजपमधून त्यांना उमेदवारी मिळणार नव्हती. त्यांनी बंड केले आणि भाजप नेत्यांच्या विनंतीनंतर माघारही घेतली.

Sudhir Parve, Devendra Fadnavis, Raju Parve
Maharashtra Poliitics : "विदर्भाचं लेकरू..." CM पदासाठी फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू होताच काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

राजू पारवे यांच्या भाजप प्रवेशाला भाजप परिवारातील सर्वांचाच विरोध होता. विधानसभा निवडणूक काळात त्यांना प्रवेश देऊ नका, त्याचा फटका बसेल, याकडेही नेत्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. प्रवेश द्यायचाच असेल तर निवडणुकीनंतर द्यावा, असेही सांगण्यात आले होते. मात्र राजू पारवे यांनी मोठ्या नेत्यांसोबत संधान साधून मागच्या दाराने तडकाफडकी  प्रवेश करून घेतला. तेथूनच भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या पराभवाची चिन्हे गडद झाली.

2019 मध्ये जातीय समीकरणाचा फटका विदर्भातील काही जागेवर बसला होता. यात उमरेडचा सुध्दा समावेश होता. त्यामुळे काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले राजू पारवे हे अपघाती आमदार ठरले. निवडून आल्यानंतर त्यांनी 'एकला चलो रे'ची वाट धरली. त्यामुळे काँग्रेसचे नेते व कार्यतर्ते त्यांच्यावर नाराज होते.

Sudhir Parve, Devendra Fadnavis, Raju Parve
Nana Patole Big News : नाना पटोले 'आरएसएस'चे एजंट, काँग्रेसच्याच नेत्याचा गंभीर आरोप

पुन्हा निवडून येण्याची शक्यता वाटत नसल्याने त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदे सेनेत प्रवेश केला. सहा महिन्यात तीन पक्ष बदलण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला. सुधीर पारवे निवडून आल्यास विधान परिषद मिळणार नाही, अशी शंका त्यांना होती. त्यामुळे अपक्ष उमेदवाराच्या ‘कढई‘त त्यांनीच तेल ओतल्याचा आरोपही भाजप कार्यकर्त्यांचा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com